विश्वचषक २०२३ मधील बहुप्रतीक्षित असा क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकाच्या चमकत्या ट्रॉफीपासून अवघा एक पाऊल दूर आहे. १९ नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत व ऑस्ट्रेलिया संघ तब्बल २० वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अंतिम सामन्यावर खिळल्या आहेत. सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी विश्वचषकाला पाठिंबा दिला असल्याचं पाहायला मिळत आहे. (Rekha Boj On World Cup 2023)
केवळ क्रिकेटप्रेमीचं नव्हे तर कलाकार मंडळीही क्रिकेटच्या प्रेमात असलेले पाहायला मिळत आहे. बॉलिवूडकरांनी क्रिकेटला दर्शविलेला पाठिंबा आजवर साऱ्यांनीच पाहिला आहे. यानंतर आता दाक्षिणात्य कलाकारांचाही विश्वचषकाला पाठिंबा पाहायला मिळत आहे. अशातच विश्वचषकावरून एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने केलेली घोषणा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. भारताने विश्वचषक जिंकला तर ती बीचवर न्यूड धावेल, असं तिने म्हटलं आहे.
लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री रेखा बोज हिने इन्स्टाग्रामवर विश्व चषक २०२३ संदर्भात केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. जर भारताने विश्वचषक जिंकला तर ती विजाग (विशाखापट्टनम) बीचवर कपड्यांशिवाय धावेल अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. रेखाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “जर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी विजाग बीचवर स्ट्रीकिंग करेन. टीम इंडियाला शुभेच्छा,” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं. स्ट्रीकिंग ही एक परदेशी प्रथा असून यांत एखाद्या खेळात मोठा विजय मिळाल्यास आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कपड्यांशिवाय धावण्यात येतं.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन, कारण अजूनही अस्पष्ट
रेखाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘मग भारत नक्कीच जिंकेल’. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, ‘तू हे सर्व लक्ष वेधण्यासाठी करत आहेस. भारतीय संघाच्या नावाने काही बोलू नकोस. याची काही गरज नाही’. रेखा हिने तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं असून सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते.