शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सनातन हिंदू धर्म संपवण्याचे…” तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “जय श्रीराम आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 4, 2023 | 6:38 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss marathi fame actress megha dhade praised prime minister narendra modi after winning three states electios

“सनातन हिंदू धर्म संपवण्याचे...” तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “जय श्रीराम आणि...”

मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा व छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी (३ डिसेंबर) लागला. यांपैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या तीन राज्यात भाजपाला चांगलेच बहुमत मिळाले. त्यामुळे या निकालावर सध्या सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल कौतुक होत आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेनेदेखील या निकालावर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Megha Dhade On Instagram)

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत भाजपाला मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तिने भाजपाच्या तीन राज्यातल्या विजयाबद्दल पोस्ट केली आहे. तिने एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “भारतीय जनता पार्टी झिंदाबाद… जय श्रीराम… तिन्ही राज्यातल्या जनतेचे मनापासून अभिनंदन… तिन्ही राज्यातल्या कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन… तेलंगणा राज्यातही भाजपाचा प्रवेश झाला… तिथे जोमाने काम करणार्‍या पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन…” असं म्हणत विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

आणखी वाचा – Video : धमाल-मस्ती, जंगी सेलिब्रेशन अन्…; बोमन इराणींच्या बर्थडे पार्टीला बायकोला घेऊन गेला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तिचं स्वप्न…”

यापुढे तिने असे म्हटले आहे की, “सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्‍या पक्षांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली…सहकाऱ्यांनो आपणही अशीच मेहनत घेऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये मिळणार्‍या यशात, सांस्कृतिक प्रकोष्ठ म्हणून खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलू… जय हिंद…”. सध्या तिने शेअर केलेल्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.

आणखी वाचा – “तू रोमँटिक सीन करताना तुझ्या बायकोला असुरक्षित वाटतं का?”, प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं थेट उत्तर, म्हणाला, “तिला कायम…”

दरम्यान, मेघा मनोरंजन या क्षेत्राबरोबरच राजकारण या क्षेत्रातदेखील कार्यरत आहे. याच वर्षी जून महिन्यात तिने भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेशची सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे. ‘बिग बॉस’ मराठीमुळे ही अभिनेत्री घराघरांत पोहोचली.

Tags: bigg bossbigg boss marathientertainmententertainment newsmarathi actressmegha dhade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Hardeek Joshi Emotional Post

Video : “तू नेहमीच…”, वहिनीच्या निधनानंतर हार्दिक जोशीने शेअर केला भावुक व्हिडीओ, परदेशात एकत्र फिरले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.