मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. त्याने आपल्या दमदार अभिनयातून सगळ्यांचं मनं जिकलं. मराठीप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयातून स्वतःचे वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. जितेंद्र सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आयुष्यातील विविध क्षण तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतो. नुकताच तो अभिनेता बोमन ईराणी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. तेथील खास क्षणांची झलक त्याने व्हिडीओ रुपात शेअर केली आहे.(jitendra joshi share post of boman irani birthday party)
बोमन इराणी यांचा नुकताच ६४ वा वाढदिवस मोठ्या धणक्यात साजरा झाला. या खास प्रसंगी त्यांना शुभेच्छा द्यायला बरीच मंडळी उपस्थित होती. फराह खान, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी या पार्टीची शोभा आणखीनच वाढवली. या पार्टीला मराठमोळ्या जितेंद्रनेही त्याच्या बायकोसह हजेरी लावली. त्यादरम्यानचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याने सुंदर असं कॅप्शन लिहीलं आहे. जितेंद्र लिहीतो, “काही वर्षांपूर्वी मी या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहीन किंवा फक्त एका फोन कॉलच्या अंतरावर असलेल्या एखाद्या व्यक्तींच्या यादीत मी असेन याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. या सगळ्याचा माझ्या आपुलकीशी, क्षमतेशी काहीही संबंध नाही. हे सगळं अद्भुत बोमन इरानी सर यांचं प्रेम आहे. सर त्यांच्या बायकोला, मुलांना आणि इतरांनाही इतकं सांभाळून घेतात की आपल्याला स्वतःलाच आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग असल्यासारखं वाटतं”.
तो पुढे लिहीतो, “या खास रात्रीमुळे त्यांनी मला या मौल्यवान क्षणांची आणखी एक सुंदर भेट दिली आहे. ज्याने मला पुन्हा पटवून दिलं की हे एक खूप सुंदर अद्भुत जग आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बोमन इराणी सर! आम्हाला तुमच्या कुटुंबाचा भाग बनवल्याबद्दल झेनोबिआ इराणी काकी तुमचे खूप धन्यवाद. तुमच्या आशीर्वादांसाठी खूप खूप आभार! अभिषेक बच्चनजी माझ्या पत्नीचं स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल खूप धन्यवाद!”, असं लिहीत त्याने बोमन इराणी यांच्या वाढदिवसातील ते सुंदर क्षण त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहे.
नेटकऱ्यांसह कलाकरांनीही लाईक व कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर, नम्रता संभेराव, अभिनेतार प्रसाद ओकसह इतर कलाकारांनी व्हिडीओवर इमोजी पाठवल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.