बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “तू नेहमीच…”, वहिनीच्या निधनानंतर हार्दिक जोशीने शेअर केला भावुक व्हिडीओ, परदेशात एकत्र फिरले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 4, 2023 | 6:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hardeek Joshi Emotional Post

Video : “तू नेहमीच…”, वहिनीच्या निधनानंतर हार्दिक जोशीने शेअर केला भावुक व्हिडीओ, परदेशात एकत्र फिरले अन्…

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. छोट्या पडद्यावरील त्याच्या भूमिकांमधून त्याने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यानंतर आता लवकरच हार्दिक छोटा पडदा गाजवायला ‘जाऊबाई गावात’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हार्दिक अभिनयाबरोबरचं सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच काही दिवसांपूर्वी हार्दिकने शेअर केलेल्या भावुक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (Hardeek Joshi Emotional Post)

काही दिवसांपूर्वीच हार्दिक जोशीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हार्दिक जोशीच्या मोठ्या भावाच्या पत्नीचं निधन झालं. हार्दिक जोशीच्या वहिनीचं आकस्मिक निधन झालं असल्याचं त्याने या पोस्टद्वारे सांगितलं होतं. याबाबतची एक भावुक पोस्ट हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. त्याच्या या पोस्टवरून तो बराच खचलेला दिसला. हार्दिक व त्याच्या वहिनीचं अगदी जवळच नातं होतं.

आणखी वाचा – Video : धमाल-मस्ती, जंगी सेलिब्रेशन अन्…; बोमन इराणींच्या बर्थडे पार्टीला बायकोला घेऊन गेला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तिचं स्वप्न…”

View this post on Instagram

A post shared by HARDEEK JOSHI (Hardik joshi) (@hardeek_joshi)

यानंतर आता पुन्हा एकदा हार्दिकने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हार्दिकने त्याच्या वहिनीच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने वहिणीबरोबर परदेशात फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिकची वहिनी, भाऊ, पुतणी व अक्षयाही दिसत आहे. सहकुटुंब त्यांनी धमाल मस्ती करतानाचा हा व्हिडीओ हार्दिकने शेअर करत, “तुझं स्थान कायम आमच्या मनात घर करून राहील. तसेच मी तुला खूप मिस करतोय. मी तुला कधीच विसरू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी” असं त्याने कॅप्शन देत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “तू रोमँटिक सीन करताना तुझ्या बायकोला असुरक्षित वाटतं का?”, प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं थेट उत्तर, म्हणाला, “तिला कायम…”

हार्दिकने त्याच्या वहिनीसाठी खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने, “मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरवत तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल” अशी भावुक करणारी पोस्ट वाहिनीचं निधन झाल्यानंतर केली होती.

Tags: akshaya deodharentertainmenthardeek joshihardeek joshi emotionalhardeek joshi emotional postmarathi actormarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
ranbir kapoor starrer animal movie box office collection of 4 days see the details

'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये तुफान गर्दी, तीन दिवसांतच कमावले इतके कोटी, चित्रपटातील मराठी कलाकारांचंही कौतुक अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.