शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बायकोने साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन असावं आणि…” सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोकडून अपेक्षा, म्हणाला, “घास भरवत…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 8, 2024 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan expressed his expectations about his future wife see the details

Bigg Boss Marathi 5 Winner सूरज चव्हाणने सांगितलं, त्याला नेमकी कशी बायको हवी?

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : ‘बिग बॉस मराठी’चे यंदाचे पर्व चांगलेच गाजले. ७० दिवस चाललेल्या या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. दरम्यान, काल (रविवार ६ ऑक्टोबर) रोजी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सांगता झाली. ग्रँड फिनालेमध्ये गुलिगत धोका हा डायलॉग संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध करणारा सूरज चव्हाण विजयी ठरला. सूरज चव्हाणला बक्षीस म्हणून लाखो रुपये मिळाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या गँड फिनालेमध्ये एकूण सहा स्पर्धक होते, त्यात सूरजने विजेतेपद पटकावले.  या घरात त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली. (Bigg Boss Marathi Season 5 Winner)

बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण त्याचया साध्या वागणुकीने, भोळ्या स्वभावाने जितका चर्चेत राहिला. तितकाच तो त्याच्या लग्नाच्या वकतव्यांनीही चर्चेत राहिला. याआधी त्याने बिग बॉसच्या घरात सूरजने त्याच्या लग्नाचं प्लॅनिंग निक्की आणि अभिजीतला सांगितलं होतं. यावेळी सूरजने त्याला छोट्या पद्धतीने लग्न करायचं आहे. जास्त पण मोठ्या पद्धतीने नाही. देवी मरीमातेच्या देवळात एकमेकांच्या गळ्यात हार घालत साध्या पद्धतीए लग्न करायचं आहे असं म्हटलं होतं. तसंच त्याने अनाथ मुलीबरोबर लग्न करायचे असल्याचेही म्हटलं होतं.

आणखी वाचा – “हिरोईन बनून बाहेर आले आणि…”, जान्हवी किल्लेकरची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महाराष्ट्राला माझा राग पण…”

अशातच सूरजने पुन्हा एकदा त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे, बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर इट्स मज्जाशी खास संवाद साधला. यावेळी तो असं म्हणाला की, “तिने माझ्या पोटापाण्याचं बघावं. लाडाने आणि गोडीने घास भरवावं. माझ्या खूप काही अपेक्षा नाहीत. तिला पाहिजे तसं तिने वागावं. माझी तिच्याच्याकडे फक्त एकच विनंती असेल की, तिने साडी घालून आणि डोक्यावर पदर घेऊन असावं. बस्स…”. सूरजच्या या लग्नाच्या चर्चा आता सोशल मीडियावरही चांगल्याच व्हायरल होताना दिसत आहेत.

आणखी वाचा – “घरात काहीच कळत नव्हतं आणि…”, Bigg Boss मध्ये कमी बोलण्यावरुन सूरज चव्हाणचं वक्तव्य, गोंधळला कारण…

दरम्यान, एकूण सहा स्पर्धकांच्या या लढतीत सूरजने टॉप २ मध्ये  बाजी मारत अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान मिळवलं आणि प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा विजेता केलं. सूरजला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. यानिमित्ताने त्याचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे.

Tags: Bigg Boss Marathi 5 Winner Suraj ChavanBigg Boss Marathi Season 5 Winner Suraj ChavanSuraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
CID show close reason

२० वर्षांनंतर CID मालिका बंद का झाली?, शिवाजी साटम यांचा मोठा खुलासा, म्हणाले, "निर्माते-वाहिनीमध्ये समस्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.