Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या ७० दिवसांपासून महाराष्ट्रात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचीच चर्चा होती. मित्रांच्या कट्ट्यापासून ते गावच्या चावडीपर्यंत फक्त ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना दिलेले टाक्स आणि स्पर्धकांमध्ये होत असलेले वाद यावर चर्चा होत होती. दरम्यान, काल (रविवार ६ ऑक्टोबर) रोजी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सांगता झाली. ग्रँड फिनालेमध्ये गुलिगत धोका हा डायलॉग संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध करणारा सूरज चव्हाण विजयी ठरला. सूरज चव्हाणला बक्षीस म्हणून लाखो रुपये मिळाले आहेत. मात्र या सर्व ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसची जान्हवी किल्लेकर ही एक स्पर्धक चांगलाच भाव खाऊन गेली आहे. (Bigg Boss Marathi 5 Janhavi Killekar)
बिग बॉस मराठीच्या गँड फिनालेमध्ये एकूण सहा स्पर्धक होते. यामध्ये जान्हवी किल्लेकरचाही समावेश होता. जान्हवी किल्लेकर ही थेट सहाव्या स्थानावर होती. मात्र तिला थेट दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस मिळालं आहे. ९ लाख रुपये घेत त्याने या घरातून एक्झिट घेतली. या घरात जान्हवीने केलेल्या अनेक अपमानास्पद वक्तव्यांची चर्चा रंगली होती आणि याचे संपूर्ण महाराष्ट्रभरात पडसाद उमटले. याबद्दल तिला अनेक रोषाला सामोरे लावे लागले. याबद्दल जान्हवीने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा –
‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड प्रीमियर सोहळा पार झाल्यानंतर जान्हवीने इट्स मज्जाशी संवाद साधला. यावेळी तिने असं म्हटलं की, “बिग बॉसच्या घरात जाण्यामागचा विचार हा होता की आतापर्यंत जान्हवीला सर्वांनी व्हिलन म्हणून पाहिलं आहे. पण जान्हवी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे बघितलंच नाही. जान्हवी सुरुवातीला व्हिलनच दिसली. पण बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर लोकांनी म्हटलं की, जान्हवी व्हिलन म्हणून आत गेली आणि हिरोईन म्हणून बाहेर आली. लोकांचे हे मत मला खूप आवडले. मी चुकले पण मी स्वत:ला सुधरण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या चुकीचे मी प्रायश्चितही घेतल आणि मी आता आनंदी आहे”.
आणखी वाचा –
यापुढे तिने असं म्हटलं की, “मी केलेल्या चुकीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राने १०० टक्के नाही पण ७० टक्के तरी माझा स्वीकार केला आहे. बिग बॉसच्या घरात जान्हवी अशी नव्हती पण ती वागली यांचे कारण काय ते माहीत नाही. पण शेवटी जी खरी जान्हवी होती तीच दिसली. लोकांना माझ्याबद्दल प्रॉब्लेम आहेत पण ते स्वाभाविक आहे. त्यांना राग असणारच कारण मी वागलेच तशी. पण या लोकांची मला काही चीड किंवा राग नाही”.