Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : ‘बिग बॉस मराठी’चे यंदाचे पर्व चांगलेच गाजले. ७० दिवस चाललेल्या या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. दरम्यान, काल (रविवार ६ ऑक्टोबर) रोजी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सांगता झाली. ग्रँड फिनालेमध्ये गुलिगत धोका हा डायलॉग संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध करणारा सूरज चव्हाण विजयी ठरला. सूरज चव्हाणला बक्षीस म्हणून लाखो रुपये मिळाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या गँड फिनालेमध्ये एकूण सहा स्पर्धक होते, त्यात सूरजने विजेतेपद पटकावले. या घरात त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली. (Bigg Boss Marathi Season 5 Winner)
बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण त्याचया साध्या वागणुकीने, भोळ्या स्वभावाने जितका चर्चेत राहिला. तितकाच तो त्याच्या लग्नाच्या वकतव्यांनीही चर्चेत राहिला. याआधी त्याने बिग बॉसच्या घरात सूरजने त्याच्या लग्नाचं प्लॅनिंग निक्की आणि अभिजीतला सांगितलं होतं. यावेळी सूरजने त्याला छोट्या पद्धतीने लग्न करायचं आहे. जास्त पण मोठ्या पद्धतीने नाही. देवी मरीमातेच्या देवळात एकमेकांच्या गळ्यात हार घालत साध्या पद्धतीए लग्न करायचं आहे असं म्हटलं होतं. तसंच त्याने अनाथ मुलीबरोबर लग्न करायचे असल्याचेही म्हटलं होतं.
आणखी वाचा – “हिरोईन बनून बाहेर आले आणि…”, जान्हवी किल्लेकरची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महाराष्ट्राला माझा राग पण…”
अशातच सूरजने पुन्हा एकदा त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे, बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर इट्स मज्जाशी खास संवाद साधला. यावेळी तो असं म्हणाला की, “तिने माझ्या पोटापाण्याचं बघावं. लाडाने आणि गोडीने घास भरवावं. माझ्या खूप काही अपेक्षा नाहीत. तिला पाहिजे तसं तिने वागावं. माझी तिच्याच्याकडे फक्त एकच विनंती असेल की, तिने साडी घालून आणि डोक्यावर पदर घेऊन असावं. बस्स…”. सूरजच्या या लग्नाच्या चर्चा आता सोशल मीडियावरही चांगल्याच व्हायरल होताना दिसत आहेत.
आणखी वाचा – “घरात काहीच कळत नव्हतं आणि…”, Bigg Boss मध्ये कमी बोलण्यावरुन सूरज चव्हाणचं वक्तव्य, गोंधळला कारण…
दरम्यान, एकूण सहा स्पर्धकांच्या या लढतीत सूरजने टॉप २ मध्ये बाजी मारत अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान मिळवलं आणि प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा विजेता केलं. सूरजला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. यानिमित्ताने त्याचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे.