Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर सूरजने आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे. सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालं. (Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan)
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे ‘बिग बॉस मराठी ५’चे फायनलिस्ट होते. सूरज, अभिजीत आणि निक्कीन हे टॉप ३ मध्ये होते. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप २ मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा विजेता केलं. सूरजला ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. विजेता झाल्यानंतर सूरजने इट्स मज्जाशी संवाद साधला.
आणखी वाचा – “हिरोईन बनून बाहेर आले आणि…”, जान्हवी किल्लेकरची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महाराष्ट्राला माझा राग पण…”
या संवादादरम्यान त्याला विचारण्यात आले की, “मुलाखत देताना तू खूप बोलत आहेस. पण घरामध्ये इतकं का नाही बोललास?”. यावर सूरज म्हणाला की, “नॉमिनेशन मला जमत नव्हतं. मला तीच भीती होती. कोणाला कसं नॉमिनेट करायचं हे मला कळत नव्हतं. कोणत्या मुद्द्यावर बोलायचं हेही मला कळत नव्हतं. नॉमिनेट करण्यासाठी कोणती कारणं द्यायची हेही कळेना. त्यामुळे मी शांत बसायचो. तुमचं तुम्ही बोला मी असाच बसणार असं माझं असायचं. मला कितीही नॉमिनेट करा माझ्या चाहत्यांवर मला विश्वास होता. तेच माझा जीव आहेत”.
दरम्यान, ‘बुक्कीत टेंगूळ’, ‘गुलीगत धोका’ आणि ‘झापुक झुपूक’ अशा काही गावरान शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज ‘बिग बॉस’च्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा ‘बिग बॉस’च्याच टीमकडून सांगण्यात आलं. पण ‘बिग बॉस’च्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट ‘बिग बॉस मराठी ५’च्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलं आहे.