Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व आता निरोप घेणार आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. काही दिवसांतच या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. १०० दिवसांचा असणारा हा शो आता अवघ्या ७० दिवसांवर आला आहे, याबाबत ‘बिग बॉस’ने अधिकृत घोषणा केली. ‘बिग बॉस’च्या घरात आता ७ सदस्य उरले आहेत. या सात सदस्यांपैकी निक्की तांबोळीने शेवटच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून फिनालेमध्ये जाण्याची बाजी मारली. निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस’ सीझन ५ ची पहिली ग्रँड फायनलिस्ट आहे. त्यामुळे आता उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
या उर्वरित सहा सदस्यांपैकी ज्या स्पर्धकाला कमी वोट असणार त्याला या आठवड्याच्या मध्येच हा शो सोडावा लागणार असल्याची ‘बिग बॉस’ने अधिकृत घोषणा केली. त्यामुळे या मिड वीक एलिमिनेशनमध्ये कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशातच ‘कलर्स मराठी’ने ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ स्पर्धकांना मिड वीक एव्हिक्शनबाबत सांगताना दिसत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss 18 : ‘तारक मेहता…’ फेम सोढीची ‘बिग बॉस १८’मध्ये एंट्री, तर व्हायरल भाभीच्याही नावाची होतेय चर्चा
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’च्या घरात डीजे kratex आलेला पाहायला मिळत आहे. यावेळी डीजे kratex त्याच्या तालावर स्पर्धकांना थिरकवताना दिसत आहे. या धमाल-मस्तीबरोबर स्पर्धकांच्या डोक्यावर असलेल्या मिड वीक एलिमिनेशनची टांगती तलवारची आठवण ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांना करुन दिली. आता या मिड वीक एलिमिनेशमध्ये आता कोणत्या सदस्याचा प्रवास इथेच संपणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
आणखी वाचा – नवऱ्याचे भलतेच लाड पुरवतेय योगिता चव्हाण, बनवली ‘ही’ खास डिश, सौरभने कौतुकही केलं, म्हणाला, “लग्न करा…”
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अंकिता घराबाहेर जाणार असल्याचं म्हटलं आहे. ‘बाय बाय माका तुका’, ‘अंकिता या वेळी आहे घराबाहेर’, ‘अंकिता आज घराबाहेर आली’, “अंकिता घराबाहेर आली, हे धक्कादायक आहे’, ‘अंकिता एलिमिनेट होणार’, ‘बाय बाय वर्षा ताई’, ‘अंकिता आऊट’, ‘बाय बाय कोकण कन्या’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी करत अंकिताच घराबाहेर जाणार हे जाहीर केलं.