Bigg Boss 18 Update : येत्या सहा ऑक्टोबरपासून सलमान खान ‘बिग बॉस १८’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बऱ्याच दिवसांपासून ‘बिग बॉस १८’ची प्रेक्षकांमध्ये क्रेज पाहायला मिळत आहे. या शोमध्ये येण्यासाठी अनेक कलाकारांशी संपर्कही साधला जात आहे. आता ‘बिग बॉस १८’ मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे समोर येऊ लागली आहेत. निया शर्मा व एलिस कौशिकनंतर आता आणखी तीन स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता आहे. इटाइम्सच्या मते, श्री सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग यांचे नाव ‘बिग बॉस १८’ साठी निश्चित झाले आहे. या सीझनमध्ये तो स्पर्धक म्हणून दिसणार आहे.
गुरुचरण सिंग काही महिन्यांपूर्वी प्रकाशझोतात आला होता. जेव्हा तो २०-२५ दिवस घरातून बेपत्ता होता आणि पोलिसांनीही त्यांचा शोध सुरु केला होता, त्यामुळे तो विशेष चर्चेत आला. गुरुचरण सिंग याने नंतर दावा केला की निर्माते त्यांना पैसे देत नाहीत त्यामुळे तो वैयक्तिक समस्यांना तोंड देत आहे. ‘व्हायरल भाभी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या हेमा शर्माचे नाव ‘बिग बॉस १८’ साठी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.तिला रात्रीतून शोसाठी फायनल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हेमा शर्मा सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटातही दिसली होती. तिच्या अप्रतिम डान्स व्हिडीओ व रील्समुळे तिला ‘व्हायरल भाभी’ असे नाव देण्यात आले.
आणखी वाचा – नवऱ्याचे भलतेच लाड पुरवतेय योगिता चव्हाण, बनवली ‘ही’ खास डिश, सौरभने कौतुकही केलं, म्हणाला, “लग्न करा…”
या शो संबंधित एका सूत्राने सांगितले की, हेमाचे नाव शेवटच्या क्षणी साइन करण्यात आले कारण ती बोल्ड आहे. ती कोणाला घाबरत नाही आणि आपले मत उघडपणे मांडते. तिच्यामुळे ‘बिग बॉस १८’ मध्ये मनोरंजनाचा डोस वाढणार आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे हेमा शर्मा हिने जून २०२३ मध्ये दावा केला होता की, सलमानच्या सुरक्षा पथकाने तिच्यासह गैरवर्तन केले होते. हेमा शर्माने दावा केला होता की, तिला मारहाण करण्यात आली आणि तिचा अपमान करण्यात आला होता. आणि नंतर कुत्र्याप्रमाणे सेटच्या बाहेर फेकण्यात आले होते.
‘बिग बॉस १८’ साठी अरुणाचलस्थित अभिनेत्री चुम दरंगचे नावही निश्चित झाले आहे. ती ‘बधाई दो’ चित्रपटात दिसली होती. आणि आतापर्यंत ज्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत, त्यापैकी ईशा कोप्पीकर, समीरा रेड्डी, शोएब इब्राहिम, धीरज धूपर, कनिका मान, शाहीर शेख आणि नायरा बॅनर्जी यांची नावे निश्चित झाली आहेत.