‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले व अभिनेत्री योगिता चव्हाण. मालिका विश्वात लोकप्रिय असलेली ही जोडी खऱ्या आयुष्यातही तितकीच चर्चेत राहिली. मालिकेत नायक- नायिकेच्या मुख्य भूमिकेत असलेल्या जोडीने मालिका संपल्यानंतर खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. प्रेमाची कबुली देत या जोडीने थेट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अखेर मालिकविश्वातील अंतरा व मल्हारची ही जोडी खऱ्या आयुष्यातही विशेष चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. (saurabh choughule Special Post)
योगिता व सौरभ सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. विशेषतः सौरभ व योगिता एकमेकांचे अनेक रील व्हिडीओ बनवून ते इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करतात. अशातच सौरभने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सौरभने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये योगिताने त्याच्यासाठी खास पदार्थ बनवला असल्याचं पाहायला मिळतंय. “योगिताकडून डब्बा, म्हणून सांगतो लग्न करा”, असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

योगिताने यावेळी सौरभसाठी खास कोलंबीचे सार आणि भात बनवला असल्याचं पाहायला मिळालं. शिवाय फिश फ्रायही तिने त्यासाठी डब्ब्यात दिलं होतं. योगिता व सौरभ यांच एकमेकांवर प्रचंड प्रेम असून ते नेहमीच एकत्र स्पॉट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी योगिताने ‘बिग बॉस मराठी’ सीजन पाचच्या घरातून एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली. तर कमी वोट मिळाल्याने योगिताला घराबाहेर पडावं लागलं, मात्र त्यापूर्वी योगिताला मानसिक त्रास होत असल्याचं सांगत तिने घराबाहेर पडायची इच्छाही व्यक्त केली.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 मध्ये आज होणार एलिमिनेशन, कोणता सदस्य घेणार शेवटचा निरोप?
योगिता ‘बिग बॉस’च्या घरात असतानाही सौरभ तिला भरभरुन पाठिंबा देताना दिसला. बायकोसाठी तो वेळोवेळी पोस्ट लिहिताना दिसला. काही महिन्यांपूर्वीच योगिता व सौरभ ही जोडी लग्नबंधनात अडकली. ३ मार्च रोजी योगिता व सौरभ यांनी शाही थाटामाटात विवाह सोहळा उरकला. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ व योगिता ही जोडी घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे दोघांना विशेष लोकप्रियता मिळाली.