मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे विशाल निकम. विशाल आजवर अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई मायेचं कवच’, ‘साता जल्माच्या गाठी’ अश्या अनेक मालिकेत तो दिसला. मात्र, ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे त्याला खरी लोकप्रियता मिळाली. विशाल या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला. ज्यामध्ये त्याने उत्तम खेळ खेळत प्रेक्षकांची मने जिंकली व या पर्वाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. विशाल त्याच्या चाहत्यांबरोबर नेहमीच आदराने वागतो. त्यामुळे मातीशी नाळ जोडलेला अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जातं. शिवाय सोशल मीडियावर तो बराच सक्रिय असून तो त्याच्या चाहत्यांसह फोटोज व व्हिडीओज शेअर करत असतो. असाच एक व्हिडीओ नुकतंच व्हायरल झाला, जे पाहून चाहते त्याच्या वागणुकीचे कौतुक करत आहे. (Vishal Nikam Viral Video with Fans)
विशालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. ज्याला त्याने “जो भी चाहूं, वो मैं पाऊं, ज़िंदगी में जीत जाऊं और मुझे लगता हैं भगवान की कृपा से मुझे जो चाहिये, मुझे मिल गया है. असंच प्रेम आणि तुमची साथ कायम माझ्यासोबत राहू द्या.” असं कॅप्शन दिलं आहे. तर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये असं दिसतं की, विशालबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. तेव्हा एक चाहता विशालची झलक घेण्यासाठी तिथे आला. यावेळी त्या चाहत्याकडे बटणांचा मोबाईल होता. तेव्हा विशालने त्या चाहत्याचा मोबाईल घेतला आणि मोबाईलच्या मागील कॅमेऱ्याने त्यांच्यासह एक छानसा सेल्फी घेतला. यावेळी त्या चाहत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. विशालचा हा व्हिडीओ कोल्हापुरातील असून त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
हे देखील वाचा – “आता नाही तर कधीच नाही…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेचा मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा, म्हणाली, “आत्महत्या…”
विशालच्या या व्हिडीओवर एक नेटकरी म्हणाला, “गरिबीची जाण असलेली विशाल मनाचा माणूस”. तर दुसरा नेटकरी यावर कमेंट करत म्हणाला, “विशाल भाऊ ‘बिग बॉस’ मध्ये असताना तर मन जिंकलं. पण आज परत एकदा मन जिंकलं. भाऊ सर्वसाधारण लोकांसोबत आज बटणांच्या मोबाइल मध्ये सेल्फी घेतलात. एक नंबर.” तर आणखी एक नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, “आता समजलं माझा दादा सगळ्यांना का आवडतो. तो समजून घेतो लोकांना, त्याला सगळे आपले वाटतात. असा विशाल परत एक नंबर असणार, आताही आहे.” एकूणच या व्हिडीओवर चाहते व नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा – “मराठा समाजातल्या मागास…”, मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत रितेश देशमुखचं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “त्यांच्या तब्येतीसाठी मी…”

अभिनेता विशाल निकम सध्या मालिका विश्वात सक्रिय नाही. मात्र, फोटोशूट्स, रील्स आणि म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतो. तसेच, अनेक चित्रपटांमध्ये दिसलेला हा अभिनेता लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.