Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : ‘बिग बॉस’ फेम अमृता देशमुख व प्रसाद जवादे ही जोडी १८ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. नातेवाईक, आत्पेष्ट, मित्रपरिवार व मराठीतील कलाकारांच्या उपस्थितीत यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नातील दोघांच्या पारंपरिक लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले. दरम्यान त्यांच्या लग्नाचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. (Amruta Deshmukh And Prasad Jawade After Marriage Rituals)
त्याचबरोबर संगीत, हळदी समारंभ, लग्नविधी व प्रसादच्या गळ्यातील अमृता नावाचं लॉकेट याबद्दलही चांगलीच चर्चा रंगली. लग्नानंतर अभिनेत्रीचं सासरीसुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. जवादेंच्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर अमृता-प्रसादने जोडीने सत्यनारायणाची पूजा केली. दोघांचा सत्यनारायणाच्या पूजेचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. अशातच आता अमृताच्या सासरी झालेल्या स्वागताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायली संजीवची अनोखी शक्कल, नक्की काय केलं पाहा?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
प्रसादच्या घरी अमृताचे स्वागत अगदी थाटात करण्यात आले. फुलांनी सजवेलल्या पायघड्यांवरून तिचा गृहप्रवेश करण्यात आला. यानंतर दरवाज्यातील कलश ओलांडत तिने गृहप्रवेश केला. अगदी मराठमोळ्या व पारंपरिक पद्धतीने अमृता-प्रसाद यांचे घरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा अंगठी शोधण्याचा कार्यक्रमदेखील करण्यात आला. प्रसाद-अमृताच्या उखाण्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी अमृताने प्रसादसाठी “फुलांचा गालिचा आणि दारामध्ये दिवे, मनापासून सांगते आता प्रसादच मला अहो म्हणून हवे” हा खास उखाणा घेतला, तर प्रसादनेदेखील अमृतासाठी “जवादेंच्या सूनबाईसाठी तयारी केली आहे जोरात, अमृताचं नाव घेतो आता इथून पुढे करत आहे नवीन आयुष्याला सुरुवात” हा विशेष उखाणा घेतला. दोघांच्या या उखाण्यांवर घरच्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा – लेकीसह मोठा पडदा गाजवण्यास किंग खान शाहरुखची तयारी सुरु, चित्रपटाचं नावंही आलं समोर
दरम्यान त्यांचा हा गृहप्रवेश व उखाण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर प्रसाद-अमृता ही ऑनस्क्रीन जोडी एकमेकांशी विवाहबद्ध होत खऱ्या आयुष्यातदेखील एकत्र आल्याने मित्रपरिवार व चाहत्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.