गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायली संजीवची अनोखी शक्कल, नक्की काय केलं पाहा?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 21, 2023 | 7:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress sayali sanjeev did nail art for her upcoming marathi movie jhimma 2 promotion

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायली संजीवची अनोखी शक्कल, नक्की काय केलं पाहा?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. मालिका, चित्रपटांत काम करत तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही तिची प्रचंड मोठी फॅन फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. आपल्या हटके स्टाईलमुळे ती कायम चर्चेत असते. (Sayali Sanjeev Shared Her Nail Art Photo)

अशातच आता ‘झिम्मा-२’ या चित्रपटामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आता ‘झिम्मा’ चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि याच चित्रपटाच्या निमित्ताने ती सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार विविध शक्कल लढवत असतात. अशातच तिने प्रमोशनसाठी एक नामी शक्कल लढवली आहे.

आणखी वाचा – Video : हटके पोझ, अन्…; अरुण कदमांच्या नातवाचा हटके अंदाज, व्हिडीओ व्हायरल, म्हणाले, “बॉक्सर भाई…”

सायलीने नेल-आर्ट करत ‘झिम्मा-२’चं प्रमोशन केलं आहे. तिने तिच्या नखांची एक वेगळीच स्टाईल केली आहे. नेलआर्ट करत एका नखावर झिम्मा असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या नखावर २ असं लिहिलं आहे. यावरून ती ‘झिम्मा-२’चं हटके प्रमोशन करताना दिसते. तिने केलेल्या या नेलआर्टमुळे तिची नखं आकर्षक दिसत आहेत. तसेच तिने या नखांना साजेसा असा ड्रेस परिधान केला आहे आणि या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

आणखी वाचा – ‘सुख म्हणजे…’ फेम माधवी निमकरची चाहत्यांसाठी खास पोस्ट, राहुल होनरावबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, “शालिनी-मल्हारचा…”

दरम्यान ‘बस्ता’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘दाह’, ‘झिम्मा’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशातच आता तिचा ‘झिम्मा-२’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी तिचे चाहतेदेखील कमालीचे उत्सुक आहेत.

Tags: entertainment newsjhimma 2marathi actressmarathi entertainmentmarathi moviesayali sanjeev
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
bigg boss fame actor prasad jawade and amruta deshmukh wedding after marraige rituals video viral on social media)

Video : "फुलांच्या पायघड्या, आकर्षक सजावट, अन्…", जवादेंच्या घरी नव्या सूनबाईंचं जल्लोषात स्वागत, प्रसाद-अमृताच्या उखाण्यांनी वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.