सध्या ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाने पाहिल्या आठवड्यपासूनच धुमाकुळ घालायला सुरवात केली आहे. यावेळी कार्यक्रम सुरु झाल्यापासून अनेक ट्विस्ट यामध्ये दिसून येत आहेत. तसेच यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजनदेखील होत आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी खूप राडे झालेलेदेखील पाहायला मिळाले. यावेळी गुणरत्न सदावर्ते व करणवीर मेहरा यांच्यामध्येदेखील शाब्दिक वाददेखील झाले. त्यानंतरही अनेक अपडेट पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांनी काय केले आणि घरात नक्की काय काय घडामोडी घडल्या हे पहाणे जास्त औत्सुक्याचे ठरले आहे. नक्की काय झाले? हे आता आपण जाणून घेऊया. (gunratna sadavrte bigg boss 18 )
घरांमध्ये सगळे जण एका ठिकाणी बसलेले असतात. यावेळी सगळ्यांची धमाल-मस्ती सुरु असते. यावेळी गुणरत्न यांना विचारतात की, “तुम्ही तुमच्या बायकोला मिस करत आहात का?”, त्यावर गुणरत्न उत्तर देतात की, “हो. मला खूप आठवण येते”. त्यानंतर त्यांची सगळे जण मस्करी करु लागतात आणि त्यांच्या पत्नीबद्दल बोलू लागतात. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे स्वतःची स्तुती करु लागतात. आणि सांगतात की, “मी सर्वात जास्त कर भरतो”.
त्यानंतर घरातील सर्व स्पर्धकांना एकत्र बसण्या सांगितले. त्यानंतर ‘बिग बॉस’ने विचारले की, “तुरुंगातील बंद असलेल्या लोकांना बाहेर काढला पाहिजे की नाही. तसेच तुरुंग कधीही रिकामे राहू शकत नाही”. त्यानंतर ईशा सिंह, अविनाश व करणवीर यांना कोणा एकाची तुरुंगात जाण्यासाठी निवड करावी लागेल असं ‘बिग बॉस’ने सांगितले. त्यावर तिघंही गुणरत्न यांचे नाव घेतात. हे ऐकताच गुणरत्न यांचा राग अनावर होतो.
गुणरत्न चिडून म्हणतात की, “मी काहीही झालं तरीही तुरुंगात जाणार नाही. मी स्वतः नॉमिनेट होईन पण तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडणार नाही. माझी भूमिका तशीच असेल जशी माझी भूमिका न्यायालयात असते. सरकारदेखील मला घाबरतं”. यानंतर ते खूपच चिडलेले दिसले. दरम्यान आता ‘बिग बॉस’मध्ये काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.