दिग्गज अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून आजवर मृणाल कुलकर्णी यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक चित्रपट मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण काम केल्यानंतर आता चित्रपटांच्या दिग्दर्शनात त्या विशेष लक्ष देताना दिसत आहेत. शिवाय मृणाल यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे यांनीही कलाविश्वात आपलं स्थान पक्के केलं आहे. विराजस आणि शिवानी यांच्या लग्नानंतर शिवानीला ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून खूप मोठा ब्रेक मिळाला. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अक्षरा ही साऱ्यांची आवडती आहे. (Shivani Rangole Post)
नुकतीच शिवानीने झी मराठी अवॉर्ड शोला हजेरी लावली होती. यावेळी शिवानी तिचा नवरा विराजससह दिसली. तिच्यासह तिच्या सासूबाई मृणालही होत्या. शिवानीने याआधीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावतेय. या मालिकेत शिवानीच्या सासूच्या भूमिकेत अभिनेत्री कविता मेढेकर या पाहायला मिळत आहेत. मालिकेत भुवनेश्वरी हे पात्र कविता मेढेकर साकारत असून कडक सासूबाईंच्या भूमिकेत त्या पाहायला मिळत आहेत. कविता यांनीही या अवॉर्ड शोला हजेरी लावली होती.
आणखी वाचा – Video : देशमुखांच्या मुलांचे संस्कार! रितेश देशमुखच्या भावांनी केलं आईचं औक्षण, व्हिडीओचं होत आहे कौतुक
मालिकेत कविता व शिवानी यांचं बॉण्ड ठीक दिसत नाही. या उलट खऱ्या आयुष्यातील शिवानीची सासू ही अत्यंत गोड असून शिवानी आणि मृणाल यांचं उत्तम बॉण्डिंग असलेलं पाहायला मिळतंय. अशातच शिवानीने या अवॉर्ड सोहळ्यातील तिच्या रील सासू व रिअल सासू यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. आणि या पोस्टला दिलेलं कॅप्शन लक्षवेधी आहे. पहिल्या फोटोत ते एकत्र आहेत तर दुसऱ्या फोटोत माझी सून असं म्हणत कविता लाड एकीकडून शिवानीला खेचताना दिसत आहेत, तर एकीकडून मृणाल तिचा हात खेचताना दिसत आहेत.
आणखी वाचा – ६५ व्या वर्षी संजय दत्तने चौथ्यांदा केलं लग्न, मान्यता दत्तच्या सध्या लूकची चर्चा, फोटो व्हायरल
“तुम्ही दोघं माझे मित्र, मार्गदर्शक, विश्वासपात्र, गॉसिप पार्टनर, शेफ म्हणून मिळाल्याबद्दल मी नेहमी स्वतःला भाग्यवान समजेन. मी नेहमी तुमच्या दोघांप्रमाणेच शांत आणि मोहक राहण्याचा प्रयत्न करेन. खूप प्रेम”, असं म्हणत तिने हा गमतीशीर फोटो शेअर केला आहे. हे फोटो पाहून तिघींवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.