ग्लॅमर विश्वातील अनेक सुंदर अभिनेत्री आई झाल्याचा गुडन्यूज चाहत्यांसह शेअर करत आहेत. अलीकडेच दीपिका पदुकोणने लग्नाच्या सहा वर्षांनंतर एका मुलीला जन्म दिला. आता टीव्ही अभिनेत्री सना सय्यदही नव्या आईच्या यादीत सामील झाली आहे. सना सय्यद ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. आई होणार असल्याची जाहीर कबुली दिल्यानंतर सना या तिच्या आयुष्यातील खास क्षणाचा आनंद घेत होती. आता अखेर तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु झाला आहे. (Sana Sayyad Blessed With A Baby Girl)
‘कुंडली भाग्य’ या मालिकेतील अभिनेत्री सना सय्यदने आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री आता एका मुलीची आई झाली आहे. यामुळे सना सय्यद व पती इमाद शम्सी यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. त्यांनी त्यांच्या मुलीला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार असे म्हटले आहे. सना सय्यदने २०२१ मध्ये इमाद शम्सीशी लग्न केले. सना सय्यदने सप्टेंबर २०२४ मध्ये गरोदरपणाची घोषणा केली होती आणि आता तिने चाहत्यांबरोबर आई झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले, “वेलकम बेबी गर्ल”. सना सय्यद हिने ९ ऑक्टोबर रोजी एका मुलीला जन्म दिला असून ती पूर्णपणे बरी आहे.
‘कुंडली भाग्य’मधील पलकीच्या भूमिकेमुळे सनाला लोकप्रियता मिळाली. पण प्रेग्नेंसीमुळे तिला हा शो मध्येच सोडावा लागला. आता सना आई झाली आहे आणि ती तिचा आईपणाचा नवीन टप्पा खूप एन्जॉय करणार आहे. चाहतेही तिचे खूप अभिनंदन करत आहेत. सनाने काही दिवसांपूर्वी प्रेग्नेंसी फोटोशूटही केले होते, ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती. या फोटोंमध्ये पती इमाद शम्सीही तिथे होता.
आणखी वाचा – Video : रितेश देशमुख यांनी अभिजीत सावंतला दिली ट्रॉफी, शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “ही लय भारी ट्रॉफी…”
काही काळापूर्वी सनाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, एके दिवशी संध्याकाळी जेव्हा ती टेस्ट करुन हातात प्रेग्नेंसी किट घेऊन बसली होती, तेव्हा इमाद घरी आला. त्याने सनाचा हात धरल्यावर ती रडायला लागली. त्यावेळी इमादही आनंदाने रडू लागला. सनाने सांगितले होते की, तिला आणि इमादला मुलगी हवी होती, पण सासूला मुलगा होईल असे वाटत होते.