Dhananjay Powar Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चं पर्व संपलं असलं तरी या शोची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात टिक टॉक स्टार सूरज चव्हाण विजेता ठरला, तर उपविजेतेपदाचा बहुमान अभिजीत सावंतने पटकावला. यंदाचं हे पर्व विशेष चर्चेत आलेलं पाहायला मिळालं. या पर्वातील सर्वच स्पर्धक घराबाहेर पडल्यानंतरही चर्चेत आहे. यापैकी एक सदस्य म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार म्हणजे साऱ्यांचा लाडका डीपी. ‘बिग बॉस’च्या घरात कोल्हापूरची शान असलेल्या डीपीने साऱ्यांच्या मनावर राज्य केले.
‘बिग बॉस मराठी’ मध्ये चौथ्या क्रमांकावर धनंजयला हा शो सोडावा लागला. कोल्हापुरात परतल्यावर धनंजयचं अगदी जंगी सेलिब्रेशन करण्यात आलेलं पाहायला मिळालं. कोल्हापुरात पोहोचताच आधी धनंजयने ज्योतिबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर डीजेवर आणि पारंपरिक वाद्यावर धनंजयची कोल्हापुरात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी धनंजयला पाहण्यासाठी कोल्हापुरकरांनी एकच गर्दी केली होती. धनंजयही उपस्थितांचे आभार मानताना दिसला. आता या सर्व सेलिब्रेशननंतर धनंजय पुन्हा एकदा कामावर रुजू झाला आहे.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : दिशामुळे पारूच्या जीवाला धोका, आबासाहेब प्रियाला घेऊन अहिल्यासमोर येणार का?
धनंजयचं सोसायटी या नावाने स्वतःच फर्निचरचं दुकान आहे. आता धनंजय पुन्हा एकदा कामावर परतला असल्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. “कितीही मोठी उंची प्राप्त होऊदे आपली पायरी आपण सोडायची नाही”, असं कॅप्शन देत त्याने दुकानातल्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय दुकानात जाण्यापूर्वी पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर दुकानातील काम करणाऱ्या महिला धनंजयला म्हणतात, “आता खरे हिरो बनून आला आहात. तब्येत पण भारी झालीये”. मग एक व्यक्ती मध्येच येते आणि म्हणते, “काय शेठ? हे माझ्यापेक्षा गोरे झालेत. हा विषय काय आहे?”, तेव्हा धनंजय म्हणतो, “पूर्ण वेळ एसीत होतो”.
आणखी वाचा – लेकाचा हात धरुन काजोल आली दुर्गा पंडालला, नेटकऱ्यांना आवडला माय-लेकाचा खास बॉण्ड, म्हणाले, “ही जोडी…”
त्यानंतर सर्व महिला धनंजयला वडिलांविषयी बोलताना दिसत आहेत. “बाप आणि मुलाचं नातं घट्ट झालं. बापाने जे करायचं होतं ते त्यांनी केलं आणि मुलाला जे करायचं होतं ते त्याने ‘बिग बॉस’च्या घरात करुन दाखवलं”, असं एक महिला कर्मचारी बोलताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’मुळे धनंजय व त्याच्या वडिलांमधील कित्येक वर्षांपासून असलेला अबोला संपलेला दिसला.