Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : ‘बिग बॉस १७’चा यंदाचा मानकरी सुप्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मुनव्वरच्या नावे झाली असून सध्या सर्वच स्तरातून मुनव्वरवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १७’ च्या यंदाच्या पर्वाचा ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला. यावेळी त्या शोचा होस्ट सलमान खानने मुन्नवर फारुखीचा हात उंचावून त्याला विजेता म्हणून घोषित केलं. तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या. मुनव्वर फारुकीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
‘बिग बॉस १७’चे विजेतेपद पटकावल्यानंतर मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस’च्या आकर्षक ट्रॉफीसह रोख रक्कम ५० लाख रुपये व एक अलिशान कारही बक्षीस म्हणून मिळाली. तर एकीकडे मुनव्वरच्या स्वागतासाठी डोंगरी परिसरात चाहत्यांची गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. मात्र काही प्रेक्षकांना मुनव्वर विजेता झाल्याचं आवडलेलं दिसत नाही आहे. अनेकांनी मुनव्वरच्या विजेतेपदावर शंका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता अखेर मुनव्वरने भाष्य केलं आहे.
मुनव्वरने नुकतीच इटाईम्सला मुलखात दिली यावेळी त्याने हा मुद्दा खोडून काढलेला पाहायला मिळाला. तो म्हणाला, “जे कुणी माझ्या विजयावर शंका घेत आहे त्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत असं त्याने या मुलाखतीदरम्यान सांगितलं. मुनव्वर म्हणतो, “मी फिक्स विनर होतो. असे काहींना वाटते ते चूकीचे आहे. तुम्ही या शोमध्ये मी किती मेहनत घेतली याकडे दुर्लक्ष करत आहात”.
VIDEO | "I give the credit of my success to myself. Similarly, I also blame myself for all my failures. I always accept my failures… My friendship with Abhishek (Kumar), Mannara (Chopra) and Ankita (Lokhande) will always continue," said @munawar0018 at a press conference after… pic.twitter.com/tmljSVpXBi
— Press Trust of India (@PTI_News) January 29, 2024
पुढे मुनव्वर म्हणाला, “मला माहिती आहे लोकांची मतं ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बदलत असतात. पण या सगळ्याचा त्या स्पर्धकावर काय परिणाम होतो हे लक्षात घ्यायला हवे. माझ्याविषयीचे लोकांचे जे मत आहे ते मला बदलायचे आहे. त्यांनी माझ्याकडे फिक्स विनर म्हणून पाहू नये. असे मला वाटते. मात्र आता त्यांना त्यांचे मत बदलता येणार नाही हेही मला माहिती आहे”.