बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सुशांत व तुझ्या नात्यामुळे मला त्रास झाला अन्…”, विकीने अंकिताच्या कुटुंबाला केलेली मदतही काढून दाखवली, म्हणाला “श्रीमंत जावयासारखा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 15, 2024 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 vicky jain talked about ankita lokhande and her ex bf late sushant singh rajput relationships see the details

“सुशांत व तुझ्या नात्यामुळे मला त्रास झाला अन्...”, विकीने अंकिताच्या कुटुंबाला केलेली मदतही काढून दाखवली, म्हणाला “श्रीमंत जावयासारखा...”

‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व अनेक कारणांवरुन चर्चेत राहिलं. याचे एकमेव कारण म्हणजे अंकिता लोखंडे व पती विकी जैन. अंकिता-विकी हे दोघे या शोमध्ये आल्याच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत राहणारी जोडी आहे. अशातच येत्या वीकेण्ड का वार’मध्ये करण जोहरने ‘वीकेण्ड का वार’ होस्ट केले. यावेळी त्यांनी काही स्पर्धकांना खडे बोल सुनावले. या यादीत अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याचेही नाव आहे.

नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये करण जोहरने विकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्याने असे म्हटले की, “जेव्हा तुझी आई अंकिताला टीव्हीवर प्रेक्षकांसमोर ओरडत होती, तेव्हा तू तुझ्या पत्नीची बाजू का घेतली नाहीस?” त्यावेळी विकीने करण जोहरची माफी मागितली होती. पण करणच्या जाण्यानंतर विकीही गप्प बसला नाही. याबाबत त्याने अंकिताशी बोलून त्याचा राग व्यक्त केला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हेही वाचा – “माझ्या पत्नीशी…”, बायकोला तुच्छ वागणूक दिल्यानंतर विकी जैनला समजली स्वतःची चूक, म्हणाला, “अधिक चांगलं वागणं…”

यावेळी विकी असं म्हणाला की, “माझ्या कुटुंबाने तुला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी थांबवले आहे का? किंवा तुझ्या ड्रेसिंगबद्दल काही बोलले आहेत का? लग्नानंतर तू १० दिवसही माझ्या कुटुंबाबरोबर राहिली नाहीस आणि यावर त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. “मी तुझ्या कुटुंबाबरोबर राहायला आलो, तेव्हा मी श्रीमंत जावयासारखा राहिलो की मुलासारखा? मी नेहमीच तुमच्या कुटुंबासाठी उभा राहिलो.”

हेही वाचा – “तुझा घटस्फोट झाला आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अहो लग्न…”

तसेच यावेळी विकीने अंकिताच्या एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतचाही उल्लेख करत असे म्हटले की, “जेव्हा मी तुझ्या आयुष्यात आलो तेव्हा सगळीकडे सुशांत आणि तुझ्या नात्याचीच चर्चा होती आणि मी ते सगळं सहन केलं. जर तुला माझा इतकाच त्रास होत होता, तर तेव्हा तू माझ्याशी लग्न का केलंस?.” दरम्यान, विकीचे हे बोलणे ऐकून अंकितालाही तिची चूक समजली आणि यावर तिने पुन्हा आपल्या पतीला सॉरीदेखील म्हटले.

Tags: Actress Newsankita lokhandebigg bossbigg boss 17bigg boss newsBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsvicky jainअंकीता लोखंडेअभिनेत्री बातमीबिग बॉसबिग बॉस 1बिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Ketaki Mategaonkar Post

"सलग दोन रात्री झोपले नाही अन्…", केतकी माटेगांवकर दिवस-रात्र करत आहे मेहनत, खाणं-पिणंही वेळेवर नाही, म्हणाली, "एअरपोर्टवर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.