अभिनेत्री व गायिका केतकी माटेगांवकर हिने तिच्या अभिनयाच्या व गायनाच्या दोन्ही कलांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे केतकी घराघरांत लोकप्रिय झाली. पुढे गायनाची आवड जपत केतकीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘शाळा’, ‘टाईमपास’, ‘तानी’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये केतकीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला. केतकी सोशल मीडियावरुन तिच्या अनेक इव्हेंट्सचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. (Ketaki Mategaonkar Post)
केतकी माटेगांवकर तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर अनेकदा केतकी बॉडी शेमिंगमुळे ट्रोलही झालेली आहे. दरम्यान तिने ट्रोलर्सला उत्तर दिलेलं ही पाहायला मिळालं आहे. एक कलाकार म्हणून काम करत असताना दिवस रात्र मेहनत करणं आणि आपली भूमिका चोख बजावण, तसेच बऱ्याच वेळी मिळेल ते जेवण जेवणं यासारख्या अनेक गोष्टी कलाकारांसह घडत असतात. याबाबत एक पोस्ट केतकीने शेअर केली आहे.
केतकीने एका कार्यक्रमादरम्यानचे खास क्षण शेअर करत, “सुप्रभात. सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे व अली हुसैन यांच्याबरोबर पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर करत आहे. यातील प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरु झाला असला तरी मज्जा आली. विमानाच्या वेळांमुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकाचा किंवा गायिकेचा आवाज चोवीस तास त्यांच्याबरोबर असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्टवर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं हे होत राहतं” असं म्हटलं आहे.
या पोस्टवरुन केतकीचं कलेप्रतीचं प्रेम, आदर, जबाबदारी पाहायला मिळत आहे. काम करत असताना आलेल्या अडचणींचा सामना करत अभिनेत्री तिच्यापरीने होईस्तोवर प्रयत्न करत असते.