शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नाआधीही एकत्र राहिलो अन्…”, विकी जैनला बायकोशिवाय करमेना, अंकिता लोखंडेला भेटायची ओढ, म्हणाला, “चुका होतात पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 27, 2024 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

"लग्नाआधीही एकत्र राहिलो अन्...", विकी जैनला बायकोशिवाय करमेना, अंकिता लोखंडेला भेटायची ओढ, म्हणाला, "चुका होतात पण..."

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांचा शेवटचा दिवस आहे. अंतिम फेरीची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस’चा हा सीझन खूप चर्चेत आहे. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर शोमध्ये आली होती. अंकिता ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान विकी फिनाले पर्यंत न पोहोचता शोमधून बाहेर पडला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विकी मजा करताना दिसत आहे, शिवाय त्याला अंकिताची आठवण येत आहे.

विकीने अलीकडेच पापाराझींशी त्याच्या ‘बिग बॉस’च्या प्रवासाबद्दल भाष्य केलं तेव्हा त्याने त्याची पत्नी अंकिताला मिस करत असल्याचं सांगितलं. तिच्या प्रवासाविषयी बोलताना विकी म्हणाला, “शोमधील माझा प्रवास अप्रतिम होता आणि लोकांना तो आवडला याचा मला आनंद आहे. मी खूप आभारी आहे. प्रेम व समर्थनासाठी मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी शोचा खूप आनंद घेतला आणि मी ठीक आहे. मी ‘बिग बॉस’ ट्रॉफी जिंकल्यानंतर अंकू घरी येण्याची वाट पाहत आहे”.

आणखी वाचा – “जेव्हा मराठा लढतो तेव्हा…”, मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “इतिहास…”

विकी पुढे म्हणाला, “मी अंकिताला खूप मिस करत आहे. मला तिच्याबरोबर राहण्याची सवय झाली आहे. आम्ही कधीच वेगळे राहिलो नाही, लग्नाआधीही नाही. त्यामुळे मी फक्त तिची वाट पाहत आहे”. जेव्हा विकीला इतर फायनलिस्टच्या चाहत्यांनी अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल केल्याबद्दल विचारलं यावरही विकी जैन स्पष्ट बोलला.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : घर, रुम अन्…; इतकी सुंदर आहे ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी, विजेत्या स्पर्धकाला मिळणार एवढी रक्कम अन्…; कोण ठरणार मानकरी?

विकी म्हणाला, “‘बिग बॉस’ हा एक शो आहे जिथे तुम्ही कोणाचीही इमेज ठरवून चांगली दाखवू शकत नाही. शोमध्ये जसे आहे तसे दिसते. खेळाच्या दबावाखाली लोक चुका करतात आणि काहीतरी करतात. इतका वेळ एकत्र घालवल्यानंतर नाती अधिक घट्ट होतात. आणि तिथून बाहेर पडल्यावरही नाती घट्ट राहतील. अंकिताने ट्रॉफी घरी आणावी अशी माझी इच्छा आहे”.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainbigg bossbigg boss 17entertainmentvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
Bigg Boss 17

“दोघींमध्ये आता…”, सासू व आईच्या भांडणात विकी जैनची सावरासावर, बायकोशी न पटण्यावरुन म्हणाला, “एकत्र पहिल्यांदाच राहिलो पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.