‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. गेले काही दिवस या शोमध्ये अनेक् ट्विस्ट येत आहेत. घरातील भांडणं, गॉसिप्स, वादविवाद या कारणांनी हा शो चांगलाच गाजत आहे. ‘वीकेण्ड का वार’ मध्ये सलमान खानकडून घरातील स्पर्धकांची घेतली जाणारी शाळा हादेखील या शोमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आशातच येत्या शनिवारी व रविवारी होणारा ‘वीकेण्ड का वार’ हा खुपच रंजक होणार असल्याचे दिसत आहे. नुकताच या शोचा ‘वीकेण्ड का वार’चा खास प्रोमो समोर आला आहे. (Bigg Bigg 17 New Promo)
सोशल मीडियावर सध्या या प्रोमोची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये सलमानच्या रागाचा पारा वाढल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये तो घरातील सर्व स्पर्धकांवर रागावलेला दिसत असून तो अभिषेक व मन्नारा यांच्यावर चांगलाच भडकला आहे. अभिषेकने ईशाबरोबर केलेल्या गैरवर्तनाबाबत सलमान त्याचा चांगलाच समाचार घेताना दिसणार आहे. सलमानच्या बोलण्याने अभिषेकची बोलतीच बंद झाली आहे.
Promo #BiggBoss17 #WeekendKaVaar #SalmanKhan blasts on #AbhishekKumar and #MannaraChopra pic.twitter.com/NuaWnY5rJr
— The Khabri (@TheKhabriTweets) December 7, 2023
प्रोमोमध्ये सलमान असे म्हणतो की, “जर आम्ही बिग बॉस शोमध्ये सर्वात खोट्या स्पर्धकाचा पुरस्कार दिला, तर या घरातील अभिषेक हा एकच स्पर्धक यासाठी पात्र ठरेल. ईशाला रात्री कुठेतरी जायला सांगणे हे जर तू माझ्यासमोर बोलला असतास तर तुझी काही खैर नसती. मी तुला काय केले असते हेही मला माहीत नाही.” यापुढे ईशाला उद्देशून सलमान असे म्हणतो की, “ईशा यापुढे हा रडला, वस्तू तोडल्या इतकंच नव्हे तर त्याचे डोकं जरी आपटलं तरी तू त्याच्याकडे जायचं नाहीस.” दरम्यान सलमान अभिषेकवर ओरडत असताना अभिषेक पूर्णवेळ मान खाली घालून उभा असतो. तसेच सलमानच्या बोलण्याने ईशा थोडी भावनिक झाल्याचेही या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
यापुढे सलमान मन्नाराचीही चांगलीच शाळा घेतो. तिला ओरडत असे म्हणतो की, “मी तुझ्यावर खूप नाराज आहे. तुझे लहान मुलांसारखे वागण्याचे वय गेले. मुनव्वर, तू पूर्ण जग पाहिले आहेस? असं कधी होतं का? यावर मुनव्वर उत्तर देत नाही म्हणतो. यापुढे सलमान मुन्नवरला मन्नाराबद्दल सांगताना असे म्हणतो की, “तिला समजावून सांगण्याची जबाबदारी तुझी नाही. ती तिचा तिचा वैयक्तिक खेळ खेळत आहे.” दरम्यान, गेल्या काही भागांत अभिषेकने ईशाबद्दल “तू रात्रीची क्लबमध्ये जाते आणि थेट दुसऱ्याच दिवशी घरी येतेस. तुझ्या आई-वडिलांना तू काय काय करतेस याबद्दल माहिती नाही. तू सुंदर दिसण्यासाठी इनजेक्शन घेतेस” अशी आक्षेपार्ह विधाने केली आहेत तर ईशानेही अभिषेकवर तो नाईट् स्टँड करत असल्याचा आरोप केला आहे.
त्याचबरोबर या प्रोमोमध्ये आणखी एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाचे एण्ट्रीदेखील होणार आहे. या वाइल्ड कार्ड स्पर्धककाचे नाव ओरा असे असून त्याच्याबरोबर सलमान खान धमाल-मस्ती मजा करताना दिसत आहे. त्यामुळे बिग बॉस’चे आगामी भाग हे बिगबॉस च्या प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार असून आता घरातील स्पर्धा अधिकच रंजक होणारअसल्याचे पाहायला मिळत आहे.