बुधवार, सप्टेंबर 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुनच्या वहिनीकडून अप्पीचा अपमान, दोघांमधला कडूपणा अजूनही कायम, अमोल-अर्जुन यांची भेट नक्की कधी होणार?

Saurabh Moreby Saurabh More
मे 19, 2024 | 3:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector zee Marathi serial update when will Amol-Arjun's meet

अर्जुनच्या वाहिणीकडून अप्पीचा अपमान, दोघांमधला कडूपणा अजूनही कायम, अमोल-अर्जुन यांची भेट नक्की कधी होणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेने नुकतीच सात वर्षांची लीप घेतल्याने मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण आले आहे. या नवीन कथानकात अप्पी व अर्जुन यांचा मुलगा अमोल याचीही एंट्रीही झाली आहे. त्यामुळे अप्पी व अमोलची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र या लीपमुळे अमोल व अर्जुन यांची ताटातुट झाली असून अर्जुन व अमोल कधी एकत्र येणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

अमोल व अर्जुन एकमेकांना भेटत असले तरी दोघांपैकी कुणालाच त्यांच्या नात्याविषयी माहिती नाही. सात वर्षांपूर्वी अर्जुनने अप्पीला न भेटण्याचे व त्याच्याविषयी अमोलला माहीत न पडू देण्याचे वचन दिले होते आणि तेच वचन अप्पी आता पाळत आहे. मात्र अमोल व अर्जुन यांची भेट कधी होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि हा प्रोमो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या नवीन प्रोमोमध्ये अप्पी अर्जुनच्या घरी त्याला भेटायला येते. मात्र अर्जुनची वाहिनी तिचा अपमान करते. या व्हिडीओमध्ये अप्पी रुपालीला वाहिनी म्हणून हाक मारते. मात्र रुपाली तिला ओळख न दाखवता “कोण आपण?” असा प्रश्न विचारते. यावर अप्पी “मी तुमची अपर्णा” असं म्हणते तिची ओळख सांगते. मात्र रुपाली तिचा अपमान करत “आमची अपर्णा आमच्यासाठी मेली” असं म्हणते.

आणखी वाचा – ठरलं तर मग! ‘या’ दिवशी येणार बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापुर’चा तिसरा सीझन, पंकज त्रिपाठींच्या ‘त्या’ पोस्टमुळे उत्सुकता शिगेला

यापुढे अप्पी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र रुपाली तिला आली आहेस तशीच परत जा, आपला काहीही संबंध नाही” असा म्हणत तिला जायला सांगते. यावर अप्पी अमोलविषयी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र रुपाली अप्पीच्या तोंडावर दरवाजा बंद करते आणि “आता कुठे भाऊजी सावरत आहेत. त्यामुळे तू त्याच्या आयुष्यात पुन्हा येऊम त्याचं आयुष्य बरबाद करू नको” असं म्हणते.       

आणखी वाचा – रुपालीच्या सांगण्यावरुन राजाध्यक्ष कुटुंबियांचा नेत्रा, अद्वैत व इंद्राणीवर हल्ला, लेकींच्या मदतीला धावली देवीआई, आता विरोचक व त्रिनयना देवीचा संहार

दरम्यान, या नवीन प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मालिकेत आता अर्जुन, अप्पी  व अमोल हे तिघे एकत्र येणार का? अप्पी-अर्जुन यांच्या नात्यातला कडूपणा कमी होणार? की आणखी वाढणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.  

Tags: appi aamchi collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Laapata Ladies fame Marathi actress Chhaya Kadam shared an emotional post for her mother.

"विमानातून फिरवण्याचे स्वप्न अधुरे राहिले पण...”, आईच्या आठवणीत छाया कदम भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “आज तू हवी होतीस...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.