बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’साठी परिणीती चोप्राकडून पाठिंबा न मिळण्याबाबत मन्नारा चोप्रा स्पष्टच बोलली, म्हणाली, “जुने वाद…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 31, 2024 | 5:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mannara Chopra On Parineeti Chopra

'बिग बॉस'साठी परिणीती चोप्राकडून पाठिंबा न मिळण्याबाबत मन्नारा चोप्रा स्पष्टचं बोलली, म्हणाली, "जुने वाद…"'बिग बॉस'साठी परिणीती चोप्राकडून पाठिंबा न मिळण्याबाबत मन्नारा चोप्रा स्पष्टच बोलली, म्हणाली, "जुने वाद…"

‘बिग बॉस १७’चं पर्व संपलं असून सुप्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीने यंदाच्या ट्रॉफीचा मान पटकावला. तर उपविजेता अभिषेक कुमार ठरला. तिसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री मन्नारा चोप्रा आली. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर मन्नारा चर्चेत आली आहे. मन्नारा ‘बिग बॉस’मध्ये असताना तिची चुलत बहीण प्रियांका चोप्राने तिला सपोर्ट केलं होता. प्रियांकाने मन्नारासाठी पोस्टही शेअर केली होती. मात्र चुलत बहीण परिणीती चोप्राने मन्नाराच्या समर्थनार्थ कोणत्याही प्रकारची पोस्ट केलेली पाहायला मिळाली नाही. यावर आता मन्नारा चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. (Mannara Chopra On Parineeti Chopra)

‘टेली मसाला’ या एंटरटेनमेंट चॅनलशी बोलताना मन्नारा परिणीतीबाबत बोलली. तिला विचारलं गेलं की, तुला परिणीतीने कोणताही पाठिंबा दिला नाही. तर तुमचे काही जुने वाद आहेत का? यावर मन्नारा म्हणाली, “माझे कोणाशीही जुने वाद नाहीत. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते. परिणीतीचा मला कालच भलामोठा मेसेज आला होता. तिने माझं कौतुक आणि अभिनंदन केलं. नुकतीच तिने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे, त्यासाठी माझ्याकडून तिला खूप साऱ्या शुभेच्छा.”

आणखी वाचा – “तुझ्या विचारांमध्येच घाण…”, तिखट शब्दात मेघा घाडगेने पुष्कर जोगला सुनावलं, म्हणाली, “जात बघून मैत्री…”

परिणीती चोप्राने अलीकडेच म्युझिक इंडस्ट्रीत तिच्या करिअरला सुरुवात केली आहे. आता ती लाइव्ह परफॉर्मन्सही करते. याबाबतची माहिती परिणीतीने सोशल मीडियावर दिली होती. मन्नाराबद्दल बोलायचे झाले तर, ती बॉलिवूड चित्रपट ‘झिद’मध्ये दिसली होती. मात्र, बॉलीवूडमध्ये मन्नाराला तितकेसे यश आले नाही. त्यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीत प्रवेश केला. मात्र ‘बिग बॉस १७’ मधूनच तिला लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासुन चाहत्यांनी या शोमध्ये मन्नाराला पसंती दिली.

आणखी वाचा – “मला त्या दिग्गज मंडळींमध्ये…”, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर होताच अशोक सराफ भावुक, म्हणाले, “नकळत जबाबदारी…”

मन्नारा चोप्राने या शोमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळाली. अंकिता लोखंडेलाही तिने मागे सोडले. अंकिताला मागे टाकून मन्नारा टॉप ३ चा भाग बनली. शोमधून बाहेर पडल्यानंतर मन्नाराने कुटुंबासह वेळ घालवताना दिसली. प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रानेही तिला तिच्या ‘बिग बॉस’च्या प्रवासात साथ दिली.

Tags: bigg boss 17entertainmentmannara chopraMannara Chopra On Parineeti Chopramannara chopra sisterParineeti Chopra
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Mannara chopra trolled for writing bigg boss 17 winner in female category in Instagram bio see the details

उर्वशी रौतेलाचं अनुकरण केल्याची चर्चा होताच मनारा चोप्रा सावध, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल, म्हणाले, “इथेही...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.