टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मधील रोजच्या रंजक वळणांमुळे हा शो दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून काही जुने सदस्य बाहेर पडले असून आता यात आणखी काही नवीन सदस्यांची भर पडणार आहे. यात अनेक सदस्यांच्या नावांचा उल्लेख होता. यातील महत्त्वाचे व लोकप्रिय नाव म्हणजे ‘ओरी’ उर्फ ओरहान अवत्रामणी. गेले काही दिवस ओरी हा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम लागणार आहे. (Bigg Boss 17 New Promo Of Orry”s Entry)
आजच्या ‘वीकेण्ड का वार’ या भागात ओरी ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. कलर्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून ओरीचा घरात प्रवेश होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी त्याने त्याच्याबरोबर बरेच सामानही आणले आहे. त्याच्या सामानाच्या बॅग्स पाहून सलमान “आम्ही प्रत्येक स्पर्धकाला या शोमध्ये सन्मानाने पाठवतो, पण तुला सामानाने पाठवत आहोत” असं म्हणतो. यापुढे सलमान ओरीला “संपूर्ण जगाला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही काय काम करता?” असा प्रश्न विचारतो.
आणखी वाचा – …अन् सुप्रसिद्ध अभिनेत्यावर शेती करण्याची आली वेळ, आता झाली आहे अशी अवस्था, म्हणाला, “कर्जबाजारी झालो अन्…”
यावर ओरी “मी कोणते काम करतो हे संपूर्ण जगाला जाणून घ्यायचे आहे” असे उत्तर देत म्हणतो की, “मी खूप काम करतो. मी सकाळी सूर्याबरोबर उठतो आणि रात्री चंद्राबरोबर झोपतो.” त्याचे हे उत्तर ऐकून सलमानही खूप हसायला लागतो. यापुढे सलमान त्याला “तुला पार्टीला जाण्यासाठी पैसे मिळतात का?” असा प्रश्न विचारतो. यावर ओरी असे उत्तर देतो की, “मला पैसे मिळत नाहीत, या पार्ट्यांना हजर राहण्यासाठी माझ्या मॅनेजरला फोन येतात.” यावर सलमान “मॅनेजर?” अशी प्रश्नार्थक प्रतिक्रिया देतो. यावर ओरी असे म्हणतो की, “हो, माझ्याकडे ५ मॅनेजर आहेत.” त्याचे हे उत्तर एकूण सलमानदेखील आश्चर्यचकित होतो.
दरम्यान ओरी हा स्वत:ला गायक, गीत लेखक , क्रिएटिव्ह दिग्दर्शक, फॅशन स्टायलिस्ट असल्याचं सांगतो. त्याचबरोबर तो खूप श्रीमंतही असल्याचे सांगितले जाते. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये असं सांगितले आहे की, त्याच्याकडे तब्बल ९ लाख ८० हजार रुपयांच्या घड्याळांपासून १.५ लाख रुपयांपर्यंतचे शूजही आहेत आणि गाडीदेखील आहे