अभिनय क्षेत्रातील असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी या क्षेत्रात आपलं नशीब आजमावल्यानंतर इतर क्षेत्राचाही विचार केला. त्यातील एक अभिनेता म्हणजे राजेश कुमार. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या कार्यक्रमात त्याची साराभाई ही भूमिका केली होती. या कार्यक्रमाने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. सध्या तो अभिनय क्षेत्रापासून लांब असलेला पाहायला मिळतो. नुकताच त्याने एका मुलाखतीत खुलासा केला की अभिनेता ते शेतकरी बनल्यामुळे त्याच्या आयुष्यात कसं वळण आलं. शेती करत असताना तो कर्जबाजारी झालं असल्याचाही त्याने खुलासा केला. (rajesh kumar went bankrupt after leaving acting)
राजेश कुमारने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला, “’साराभाई वर्सेस साराभाई’ या कार्यक्रमाचा दुसरा भाग अयशस्वी झाल्यानंतर मी अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अभिनय सोडून मी बिहारला गेलो. माझ्या गावात जाऊन शेती करायला सुरुवात केली. तीन वर्षे शेती केल्यानंतर मला या माझं उज्ज्वल भविष्य दिसू लागलं पण कोरोनाच्या महामारीमुळे माझ्या आयुष्यात पुन्हा भूकंप आला”.
राजेशने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, “२०१७मध्ये मी अभिनयातून बाहेर पडलो. मला वाटलं की मी एक अभिनेता म्हणून विकसित होत नाही आहे पण निदान शेतीच्या जगात मी एक कोरा कॅनव्हास पेपरावर रेखाटणाऱ्या चित्रकारासारखा होतो. अशा प्रकारे मी सुरुवात माझी नवीन सुरुवात केली. मी सतत पाच वर्षे शेतीत काम केलं आणि माझं सगळीकडून नुकसानंच झालं. मला निसर्गाने साथ दिली नाही”.
त्याने पुढे सांगत म्हणाला, “मी २० एकर जमिनीवर १५,००० झाडे लावली आणि ती पुरात वाहुन गेली. चार वर्षे लोटली त्यानंतर महामारीने थैमान घातलं. मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे संपून गेलो. लॉकडाऊनदरम्यान, मी माझी सगळी बचत वापरली. त्यानंतर माझ्या खिशात काही नाही राहिलं. मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो”, यानंतर राजेशने वाईट काळाला स्वतःवर प्रभावी होऊ दिलं नाही. आता त्याने पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. राजेशने नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर ‘हड्डी’ चित्रपटातही काम केलं होतं.