छोट्या पडद्यावरील बराच चर्चेत असलेला रिऑलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस १७’. हा शो सुरुवातीपासूनच बऱ्याच वादविवादांमुळे व भांडणांमुळे पाहायला मिळाली. त्यामुळे हा कार्यक्रम पाहिल्यापासूनच चांगला चर्चेत आहे. सध्या अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीचा विषय चर्चेत असताना आणखी एक विषय बराच गाजत आहे तो म्हणजे सध्या मुनव्वर फारुकीचं नाव मन्नारा चोप्राबरोबर जोडलं जात आहे. ‘बिग बॉस’चा हा सीजन सुरु झाल्यापासून मुनव्वर व मन्नारा यांच्यात खूप चांगली बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. आता यावर मुनव्वरच्या गर्लफ्रेंडने एक पोस्ट केली आहे. (munawar faruqui get called out as fake by nazila)
नाजिला सीताशी ही मुनव्वरची गर्लफ्रेंड आहे. ‘बिग बॉस’च्या घरात मुनव्वरची मन्नाराबरोबर वाढती जवळीकता पाहता नाजिताने एक पोस्ट शेअर केली. सध्या तिच्या या पोस्टची सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ती असं लिहीते, “मला असं वाटतं की एक गोष्ट सगळ्यांनाच कळली पाहिजे की, ऑनलाइन जे काही दिसतं ते सगळंच कधी खरं असतंच असं नाही. कुणीही इतकं साधं सरळ नाही जितकं ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. नेमकं खरं काय ते समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. म्हणूनच असं म्हणतात की, तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांना प्रत्यक्षात भेटू नये”.

ती पुढे लिहीते, “कारण तुम्ही जेव्हा त्यांना प्रत्यक्षात भेटता तेव्हा तुम्हाल ते जसे वाटतात तसे ते नसतात. तुम्ही त्यांच्याबाबत जो विचार केलेला असतो त्यापेक्षा ते बरेच वेगळे असतात. त्यामुळे टीव्हीवर व ऑनलाइन जे दिसतं त्यावर कधीच विश्वास ठेवू नका”.

मुनव्वर फारूकी हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याने २०२२मध्ये कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ या कार्यक्रमात भाग घेतला होता. विशेष म्हणजे तो त्या सीजनचा विजेताही ठरला होता. या शोमध्येही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. या शोमध्ये सहभागी झालेली अंजली अरोराबरोबर त्याच नाव जोडलं गेलं होतं. खरंतर मुनव्वरचं आधी एक लग्न झालं आहे त्याला एक मुलगा देखील आहे.