बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमार हा या चित्रपटसृष्टीतील लाडक्या कलाकारांपैकी एक आहे. त्याने आपल्या अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली. तो नेहमी हटके चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्यातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात. नुकताच त्याचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं पण हा चित्रपट काही खास कामगिरी करु शकला नाही. अक्षय त्याच्या चित्रपटांसह त्याच्या विनम्र स्वभावासाठी ओळखला जातो. बऱ्याचदा त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात त्याचा चाहत्यांसाठीचा विनम्र स्वभाव पाहायला मिळाला. (Akshya kumar sidelines security guards to fulfill fans wish)
अक्षयचा क्रेझ आजही चाहत्यांमध्ये बराच पाहायला मिळतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते बरेच आतुर असतात. तो कुठेही दिसला तरी त्याला पाहण्यासाठी त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसतात. नुकताच अक्षय विमानतळावर स्पॉट झाला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तेव्हा तेथील त्याच्या सुरक्षारक्षकाने त्या चाहत्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण अक्षयने त्याला थांबवत ‘जाऊ दे’ असं सांगत त्याच्या चाहत्यांबरोबर फोटो काढले.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील अक्षयचा विनम्रपणा सगळ्यांनाच आवडताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळीकडून त्याचं कौतुक होताना दिसत आहे. तर काही जण त्याला ट्रोलही करताना दिसत आहेत. चाहत्यांना फोटो काढायचे असताना तो धावताना दिसत आहे त्यामुळे ‘चित्रपटाच्या वेळी तु फोटो काढायला थांबशील आता का थांबणार?’ , असे कमेंट करत त्याला नेटकरी ट्रोल करतानाही दिसत आहेत.
नुकताच अक्षयचा ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील लूक समोर आला होता. त्याच्या या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना बरीच उत्सुकला लागून राहिली आहे. त्याबरोबर ‘बडे छोटे मियां २’, ‘वेलकम ३’, ‘हेरा फेरी ३’, ‘स्काई फोर्स’ यांसारख्या चित्रपटांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ‘वेलकम ३’ हा चित्रपट अनीस बज्मी दिग्दर्शित असणार आहेत. या मल्टीस्टार चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे.