‘बिग बॉस १७’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसतो. तर बऱ्याचवेळा तो घरातील प्रत्येकाची गुपितं उघड करतानाही दिसतो. मात्र या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ बराच रंजक होता. या आठवड्यात सलमानऐवजी करण जोहरने ‘बिग बॉस’च्या घराती सदस्यांची चांगलीच हजेरी घेतली. त्याने बऱ्याच जणांची पोल खोल केली. यासगळ्यात विकीचाही समावेश होता. विकीबाबत अंकितासमोर बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. ज्याबाबत अंकिताला काहीही कल्पना नव्हती.(karan johar revealed Vicky jain before marriage girlfriends)
‘विकेंड का वार’ सुरु होताच करणने सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली. तर काही वेळा तो मजामस्ती करताना दिसला. करणने अंकिताचं कौतुक केलं की ती खूप छान दिसते. हे ऐकून अंकिताला आनंद झाला. यानंतर करण विकीला विचारतो की अंकिताबरोबर लग्न करण्याअगोदर तू लेडी चार्मर असशील? यावर विकीने हो असं उत्तर दिलं. त्यावर करणने त्याला विचारलं की अंकिताच्या अगोदर तुझ्या किती गर्लफ्रेंड्स होत्या. त्यावर तो ५ असं उत्तर देतो. करणने त्यानंतर सना रईस खानकडे बघितलं आणि त्याला विचारलं की तू हे खरं सांगतो का? यावर सना सांगते की मला वाटलं की अंकिताच्या अगोदर त्याचे बरेच रिलेशनशीप असतील. सनाने हे सांगितल्यावर सगळे हसायला लागले.
Glad that atleast #KaranJohar made it clear to #AnkitaLokhande that it was #VickyJain & #SanaRaeesKhan holding the hands!!
— Nisha Rose???? (@JustAFierceSoul) December 1, 2023
What I didn't like more was #SalmanKhan addressing the issue in a fun way without actually addressing it!!#BiggBoss17 #BB17 pic.twitter.com/BUMJQEcm2I
गेल्या आठवड्यात विकी जैन व सना रईस खान ‘बिग बॉस’च्या घरात एकमेकांचा हात धरताना दिसले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मागच्या ‘विकेंड का वार’मध्ये याबाबत सलमान खानने हा मुद्दा विनोदी अंदाजात मांडला होता. मात्र तो कोणाबाबत बोलत आहे याचा त्याने खुलासा केला नव्हता. हा मुद्दा मांडूनही याबाबत सना किंवा विकीने काहीही सांगितलं नव्हतं. मात्र करण जोहरने या आठवड्याच्या ‘विकेंड का वार’मध्ये सना व विकीला त्यांच्या हात धरण्याबाबत चिडवलं. तेव्हा अंकिताच्या लक्षात आलं की विकी व सनाने एकमेकांचा हाथ पकडला होता. ते कळताच अंकिताला धक्का बसला. तिला याबाबत काही माहित नसल्याचं तिने सांगितलं. विकीने इशारे करत सांगितलं की सनाने त्याचा हात पकडला होता.
मात्र अंकिताच्या चेहऱ्याच रंग पुर्णपणे उतरलेला दिसला. पण त्यानंतर तिने विनोदी अंदाजात हा विषय टाळला. हा विषय तिच्यासमोर उघड होताच आता त्यांच्या नात्यात आता कोणता बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबरोबर विकीच्या आयुष्यातील गर्लफ्रेंडच्या आकड्याबाबतही खुलासा झाला. ‘विकेंड का वार’मध्ये विक्की जैनच्या गर्लफ्रेंडबाबतही खुलासा करण्यात आला. करणने विकीला विचारलं की आतापर्यंत त्याचे किती गर्लफ्रेंड्स होत्या? यावर त्याने उत्तर देलं सांगितलं की तो आजवर पाच रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याने अशा बऱ्याच जणांना डेट केलं आहे. या सगळ्या खुलाश्याचा विकी व अंकिताच्या नात्यावर काय परिणाम होणार हे येत्या भागात पाहणं रंजक ठरेल.