शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही टाकलं मागे, एका दिवसातच कमावले तब्बल…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 2, 2023 | 10:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Animal movie box office collection

Animal movie box office collection

बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटाने या वर्षाच्या सरते शेवटी बॉक्स ऑफिसवर तुफान आणलं आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई केली. शुक्रवारी १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ताबडतोड कमाई करत या वर्षीचा सर्वात मोठा ओपनिंग कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओलचा या चित्रपटातील लूक तर चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्काच होता. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली. सुरुवातीपासूनच या चित्रपटाचं क्रेझ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून दिसत होतं. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ताबडतोड कमाई केली आहे. (Animal movie box office collection)

पहिल्याच दिवशी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली असल्याचं पाहाया मिळत आहे. रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्याने पहिल्या दिवशी ३६.४२ कोटींची कमाई केली होती. मात्र त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने या वर्षीच्या ‘पठान’ व ‘गदर २’ या चित्रपटांना मागे टाकत नवं रेकॉर्ड बनवलं आहे. Sacnilk यांच्या रिपोर्टनुसार, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने शानदार ६१ करोडची अ‍ॅडव्हान्स बुकिंग केली आहे. एनसीआरमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranbir Kapoor (@ranbir__kapoor82)

आणखी वाचा – “आधीच वजन कमी आहे त्यात…”, जीममध्ये वर्कआऊट करतानाच्या व्हिडीओवरुन केतकी माटेगावकर ट्रोल, ट्रेनरलाही नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “त्याला खाण्याची…”

चित्रपटाने जगभरात पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला. यावर्षी प्रदर्शित झालेल्या बंपर चित्रपटांमधील ‘पठाण’ने पहिल्या दिवशी भारतात ५७ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात १०४.८० कोटींची कमाई  केली होती. सनी देओलच्या ‘गदर २’ ने पहिल्या दिवशी देशभरात ४०.१ कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांनी नातवाला झोपवण्यासाठी लढवली शक्कल, अंगाईही गायली अन्…; गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या चित्रपटातील रणबीरचा अवतार सर्वांना चकित करणारा ठरला. यापूर्वी तो कधीच अशा भूमिकेत दिसला नव्हता. बॉबीची या चित्रपटातील भूमिकादेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हा चित्रपट गुरुवारी ३० नोव्हेंबला अमेरिकेत प्रदर्शित झाला. उत्तर अमेरिकेत त्याने ८.३ कोटींची कमाई करून तिथे सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा विक्रम केला असल्याचं बोललं जात आहे. भारताच्या विविध भागात या चित्रपटाचं प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘कबीर सिंह’ व ‘अर्जुन रेड्डी’ यांसारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांची दक्षिणेत प्रचंड क्रेझ असल्याचं स्पष्ट होत आहे. संपूर्ण जगाला सध्या या चित्रपटाने वेड लावलं असल्याचं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.  

Tags: animal moviebox office collectionranbir kapoorstarrer worldwide on opening day 1
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
maharashtrachi hasyajtra fame actor prithvik pratap shared video of crowd of fans gathering outside the vanity van

Video : पृथ्वीक प्रतापला भेटण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, अभिनेता भारावला, म्हणाला, “अखेरच्या श्वासापर्यंत…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.