अभिनेत्री अंकिता लोखंडे ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘पवित्र रिश्ता’मधील अर्चना म्हणून तिचे चाहते आजही तिच्यावर भरभरुन प्रेम करतात, मात्र तिचा समोर आलेला एक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संतापले आहेत. याआधी अंकिता बरेचदा नेटकऱ्यांच्या तावडीत सापडली होती. आता नेटकऱ्यांच्या संतापाचे कारण म्हणजे तिच्या साडीचा पदर. अंकिता लोखंडे तिची आई वंदनाबरोबर एका शोच्या शूटिंग लोकेशनवर दिसली होती. यावेळी कॅमेरात कैद झालेल्या घटनेमुळे तिला ट्रोल केलं गेलं आहे. (Ankita Lokhande Troll)
शूटिंग लोकेशनवर व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर अभिनेत्री पापाराझींसाठी पोज देत होती. तिच्या साडीचा पदर जमिनीवर लोळत होता. अशावेळी तिची केअरटेकर धावत आली आणि साडीचा पदर उचलून अंकिताच्या हातात देऊ लागली. यादरम्यान अंकिता काहीतरी बोलली आणि ती निघून गेली. त्यानंतर अभिनेत्रीने आईसह आनंदाने पोज द्यायला सुरुवात केली.
३९ वर्षीय अंकिता लोखंडेची ही कृती काही लोकांना नाराज करणारी आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “तिचा पदर इतका जड आहे की ती स्वत: उचलू शकत नाही. पैशातून जन्माला आलेली ही चुकीची वृत्ती आहे?”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने व्यंग्यात्मक टिप्पणी केली, “व्वा, तुझा पदर खरोखर भारी आहे, परंतु तिची वृत्ती त्याहूनही जास्त लाजिरवाणी आहे”. आणखी एकाने लिहिले आहे की, “ती स्वत:हून हे निश्चित करु शकली असती”.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’नंतर अंकिता लोखंडे ‘आम्रपाली’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. संदीप सिंग या चित्रपटाची निर्मिती करत आहे. संदीप सिंग सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर प्रकाशझोतात आला होता. संदीप हा अंकिता व सुशांतचा जवळचा मित्र होता. याशिवाय ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये अंकिता पती विकी जैनबरोबर मस्ती करतानाही दिसली होती. इन्स्टाग्रामवर BTS व्हिडीओ शेअर करत तिने सांगितले की, शूटिंगदरम्यान सर्वांनी खूप मजा केली. ‘बिग बॉस १७’ ची स्पर्धक अंकिताने अलीकडेच सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १५ वर्षे पूर्ण झाल्याचा तो प्रसंग होता. यावेळी तिने सांगितले की, सुशांतच्या मदतीनेच ती या पदावर पोहोचली आहे.