शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रतिमा समजून पूर्णा आजी सायलीचा नातसून म्हणून करणार स्वीकार?, किल्लेदारांची लेक असल्याचं सत्य समोर येणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 6, 2024 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Promo

प्रतिमा समजून पूर्णा आजी सायलीचा नातसून म्हणून करणार स्वीकार?, किल्लेदारांची लेक असल्याचं सत्य समोर येणार का?

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत येणाऱ्या रंजक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या कल्पनाच्या गैरसमजापोटी सायली व अर्जुन आई-बाबा होणार असल्याची स्वप्न रंगवताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाही सायली व अर्जुन खरंच आई-बाबा होणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर एकीकडे प्रिया म्हणजेच तन्वीची नवी चालही मालिकेत पहायला मिळत आहे. (Tharal Tar Mag Promo)

रविराज किल्लेदार सध्या प्रतिमाचा शोध घेण्यात व्यस्त असतात. तर ही गोष्ट प्रियाला खटकते. प्रतिमाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून प्रिया नागराजला हाताशी घेऊन खेळी खेळते. शवागारात काम करणाऱ्या कामगाराला पैसे देऊन ते प्रतिमासारखीच एका महिलेची बॉडी घेतात आणि त्यावर प्रतिमाशी मिळत्याजुळत्या खुणा करतात. ज्यामुळे ती प्रतिमा असल्याचं सिद्ध होईल. अगदी प्रिया व नागराजच्या प्लॅनप्रमाणे सर्वकाही सुरळीत होत असतं.

आणखी वाचा – राजाध्यक्षांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुपाली रुग्णालयात दाखल, पुन्हा फसवणूकीचा डाव, नेत्रा कसं सोडवणार कोडं?

View this post on Instagram

A post shared by star_marathi_serial_official (@star_marathi_serial_official)

मालिकेत असं पाहायला मिळालं की, प्रियाच इन्स्पेक्टरला त्या बॉडीबाबत माहिती देते. त्यानंतर इन्स्पेक्टर रविराजला कॉल करुन प्रतिमाची डेड बॉडी सापडली असल्याचं सांगतात. हे ऐकून रविराज खूप घाबरतो. तर तन्वीही खोटं रडण्याचे नाटक करते. अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यांत रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालायला जाताना दिसत आहे. तर प्रतिमाच्या कार्याला किल्लेदारांकडे सुभेदार कुटुंबही आलेलं असतं.

आणखी वाचा – “मिठी मारायचे, किस करायचे अन्…”, ‘हिरामंडी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं संजय लीला भन्साळींबाबत भाष्य, म्हणाली, “सेटवर ते…”

मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये पूर्णा आजी सायलीला पाहून म्हणते की, “प्रतिमा. माझी प्रतिमा”. असं म्हणत पूर्णा आजी सायलीला जवळ करत तिचे लाड करतात. त्यावर तन्वी सायलीजवळ जाते आणि म्हणते की, “तू आताच्या आता माझ्या आईची साडी बदल नाहीतर…”, यावर पूर्णा आजी तन्वीला थांबवतात आणि सगळ्यांसमोर बोलतात की, “हिच्या रुपात मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय. त्या फोटोला हार नको घालूया”, असं म्हणतात. यावर रविराज फोटोला हार घालायला जाणार इतक्यात थांबतात. आता प्रतिमाचा भास म्हणून तरी पूर्णा आजी सायलीचा नातसून म्हणून स्वीकार करणार का?, तसेच प्रतिमा व रविराज यांची खरी मुलगी सायली असल्याचं सत्य समोर येणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
kranti redkar on sister

घरात फक्त मोठ्या बहिणीच्याच शब्दाला असतो मान; क्रांती रेडकरने व्हिडीओ शेअर करत सिद्धही केलं, व्हिडीओ पाहून तुम्हालाटी पटेल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.