‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, पारू देवाची पूजा करुन तिच्या आईचा आशीर्वाद घेते आणि आईसमोर मनं मोकळं करते तर इकडे दिशाला तिची आई किर्लोस्कर यांच्या घरी घेऊन आलेली असते. ती सांगते की, काही दिवस मी बाहेरगावी जात आहे त्यामुळे दिशाला तू तुझ्याकडे ठेव. पूर्णपणे दिशाची जबाबदारी ही तुझी असेल म्हणजे मी निश्चितपणे तिकडे राहू शकेल. यावर अहिल्यादेवी होकार देतात आणि सांगतात की, तू दिशाची काळजी करु नकोस. दिशा आता आमची जबाबदारी आहे, असं म्हणून त्या दिशाला किर्लोस्करांकडे राहायला सांगतात तर त्यानंतर तिची आई निघून गेल्यावर दिशाला त्या आराम करायला सांगतात. (Paaru Serial Update)
त्यानंतर सावित्री तिथे येते आणि सांगते की आदित्य बाबांसाठी मुलीकडची माणसे येणार होती ती आली आहे त्यावर अहिल्यादेवी आणि श्रीकांत सगळेजण बाहेर जातात. तिकडे गेल्यावर आदित्यला पाहून नवरी मुलीची आई म्हणते की, आदित्य सर खूप छान मॉडेलिंग करतात. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी सांगतात की, हा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ आहे तो मॉडेलिंग का करेल आणि आवड म्हणून असल्या तरी तो मॉडेलिंग करायची असेल तर तो मला सांगून करेल हे ऐकल्यावर आदित्यलाही घाम फुटतो. तर नवरी मुलीची आई ऐकूनच घेत नाही. तरी ती म्हणते की, आदित्य सर मी तुम्हालाच मॉडेलिंग करताना पाहिलं आहे आणि तुम्ही छान मॉडेलिंग करता एवढेच मला सांगायचं होतं, हे ऐकल्यावर अहिल्यादेवी अजूनच संतापतात.
त्यावेळेला प्रीतम व दामिनी मध्यस्थी करत तुम्ही एखादा मॉबचा व्हिडीओ पाहिला असेल, आजकाल एडिट करुन एकमेकांचे चेहरे लावले जातात, असे म्हणतात. तर अहिल्यादेवी संतापून सांगतात की, आम्हाला हे लग्न करायचं नाही आहे त्यामुळे तुम्ही निघून गेलात तरी चालेल आणि त्यांना निघून जायला सांगतात. तर इकडे गणी भातुकलीचा खेळ खेळत असतो तर पारू रांगोळी काढत असते, तेव्हा मारुती तिथे असतो आणि खेळता खेळता गणी म्हणतो की, नवरी मुलगी म्हणजेच पारू आणि नवरा मुलगा म्हणजेच आदित्य सर आहेत. हे शब्द जेव्हा मारुती ऐकतो तेव्हा मारुती खूपच चिडतो आणि गनीला बेदम मारतो आणि म्हणतो की नोकरानं नोकरासारखा राहावं व मालकाची बरोबरी करायला जाऊ नये. त्यांचे पाय जमिनीवर आहेत म्हणून आजवर आपण येथे आहोत नाहीतर आपण केव्हाचे या बंगल्या बाहेर असतो आणि पुन्हा पारू आणि आदित्य सरांचं एकमेकांशी नाव चुकून जरी जोडलं गेलं तर मी काय तुला सोडत नसतो, असं म्हणून तिथून निघून जातो. तर इकडे दिशाच्या रूममध्ये जेव्हा पारू बॅग ठेवायला जाते तेव्हा दिशा मुद्दाम बेडवरची चादर खाली टाकते आणि सांगते की, ही चादर मला लावून दे त्यानंतर दिशा तिची चप्पल फेकते आणि सांगते की चप्पल एका कोपऱ्यात ठेव हे पाहून पारूचा संताप होतो.
तेव्हा दिशा पारुला ऐकवते की, आता तू दिवस मोजायला सुरुवात कर. लवकरच तू या किर्लोस्कर बंगल्यातून बाहेर पडणार आहेस, त्यामुळे तू दिवस मोजायला सुरुवात कर. तुझं कुटुंब इथे कसे राहतं तेच मी पाहते, तू माझ्याशी सुरुवातीला काय वागली आहेस मला चांगलंच लक्षात आहे त्याचा मी बदला घेऊनच राहणार असं म्हणते. त्यावेळेला पारू दिशाची चप्पल ठेवायला खाली वाकते, तेवढ्यात तिचं गळ्यातील मंगळसूत्र बाहेर येतं, तेव्हा पारू सारवा सारव करते आणि मंगळसूत्र आत टाकते, हे अचानक दिशा पाहते. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दिशा पारुला विचारते तू माझ्यापासून काय लपवत आहेस तेव्हा पारू धावत धावत खाली जाते आता दिशा समोर पारूच्या मंगळसूत्राचं सत्य येणार का हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.