‘बिग बॉस १७’ मधील चर्चेत असलेली जोडी म्हणजे ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट. शोमध्ये असल्यापासून दोघांमध्ये अनेकदा खटके उडताना दिसले आहेत. अनेकदा त्यांच्यात जोरदार भांडण झालेलं ही पाहायला मिळालं आहे. असं असलं तरी त्यांच्यातील उत्तम बॉण्डिंग पाहूनही चाहत्यांनी अनेकवेळा त्यांचं कौतुक केलं आहे. चाहत्यांना त्यांच्या या कलाकारांबद्दल जाणून घेण्यात कायमच रस असतो. तर जाणून घेऊयात ऐश्वर्या-नील यांच्याविषयी काहीतरी खास. (Aishwarya Sharma And Neil Bhatt)
‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय शोनंतर ऐश्वर्याने पती नीलबरोबर ‘बिग बॉस १७’ मध्ये प्रवेश केला. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये तिने टॉप तीन मध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केल्यानंतर शोविषयी चिंता व्यक्त केली असली तरी विजेतेपद पटकावण्याचा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात दोघांमध्ये वादविवाद होत असले तरी अनेकदा ते एकमेकांसाठी लढत असल्याचे देखील पाहायला मिळालं आहे.
ऐश्वर्या ही एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच मॉडेलदेखील आहे. ८ डिसेंबर १९९२ रोजी मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये तिचा जन्म झाला. त्याचबरोबर तिचे बालपण व शिक्षणदेखील उज्जैनमध्येच झाले. त्यानंतर छत्तीसगडच्या खैरागढ विद्यापीठातून ती नृत्यामध्ये पदव्युत्तर झाली. नृत्य व अभिनयाच्या आवडीमुळे ऐश्वर्याने या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने ‘गुम है किसी के प्यार में’, ‘संडे विथ स्टार परिवार’ व ‘माधुरी टॉकीज’ सारख्या शोमध्ये काम केले. ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेतील पत्रलेखा साळुंखे या भूमिकेमुळे ती नावारूपाला आली. या मालिकेत ऐश्वर्या-नील यांनी एकत्र काम केले होते आणि याच मालिकेच्या निमित्ताने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट करत ३० नोव्हेंबर २०१२ रोजी दोघेही विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियावर ते दोघे चांगलेच सक्रिय असतात. एकमेकांबरोबरचे रील व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
ऐश्वर्याच्या एकूण कमाईबद्दल सांगायचे झाले तर तिची एकूण संपत्ती २१ कोटी रुपये इतकी आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असल्यामुळे तिची सर्वाधिक कमाई अभिनयातूनच होते. एका रिपोर्टनुसार १४ लाख रुपये हा तिचा मासिक पगार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान तिच्याकडे दोन महागड्या आलिशान कार असून मुंबईत त्या दोघांचं मोठं घरदेखील आहे.
आणखी वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’मधील देवकीची मालिकेतून एक्झिट, भावुक होत म्हणाली, “मी कधीच बोलली नाही की…”
नील हा एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याने डान्सर व नृत्यदिग्दर्शक म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली. ‘कबुम’ या डान्सिंग शोमध्ये भाग घेत त्याने या शोचे विजेते पद देखील भूषवले होते. २००८ मध्ये ‘बुगी वूगी’ या शोमध्ये ‘अर्सलान’ या गाण्याद्वारे त्याने या क्षेत्रात पदार्पण केले होते.
आणखी वाचा – नातवासह आदेश बांदेकरही झाले लहान, धमाल-मस्तीचे फोटोही केले शेअर, लेक म्हणतो, “आताच डोक्यावर बसला आणि…”
दरम्यान नीलच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर त्याचे वार्षिक उत्पन्न ४२ करोडोंच्या आसपास आहे. तो रिऍलिटी शो तसेच जाहिरातींद्वारे पैसे कमावतो आणि एका भागासाठी तो तब्बल ८५,००० रुपये इतके मानधन घेतो.