शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “शोमधून बाहेर आल्यानंतर…”, अंकिता लोखंडे विकी जैनबरोबर घटस्फोटाचा निर्णय घेणार?, म्हणाली, “मी निर्णय घेईन तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2024 | 6:41 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 ankita lokhande will take the decision of divorce from husband vicky jain actress gives hints

Bigg Boss 17 : "शोमधून बाहेर आल्यानंतर...", अंकिता लोखंडे विकी जैनबरोबर घटस्फोटाचा निर्णय घेणार?, म्हणाली, "मी निर्णय घेईन तेव्हा..."

‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक संघर्षच पहायला मिळाला आहे. या घरातील जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहत असतात. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. अशातच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या विकीने अंकिताची खिल्ली उडवली ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच संतापली. (Ankita Lokhande Vicky

‘बिग बॉस’च्या घरात होणारे अंकिता-विकी यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही आहेत. त्यांच्यात सतत काहीना काही कारणावरून भांडण होत आहे. अशातच आणखी एका वादाची भर पडली आहे. जेव्हा अंकिता घराबाहेर तिच्या वर्कआउट रूटीनबद्दल बोलत होती तेव्हा विकीने तिच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणला आणि ती खोटे बोलत असल्याचे म्हटले. यामुळे अंकिता वैतागली आणि तिने चिडून विकीवर उशी फेकून मारली. तसेच ईशा मालवीयला व्यायाम करताना पाहून “अंकिता असे करण्यासाठी तीन लोकांची मदत घेईल” असंही विकीने गंमतीत म्हटले.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला घेऊन प्रसाद खांडेकरचा नवा चित्रपट, स्वप्निल जोशी व प्रार्थना बेहेरेही महत्त्वाच्या भूमिकेत

यापुढे मन्नाराने अंकिताचे कौतुक करत ती हॉट दिसत असल्याचे म्हटले. मात्र, यावर विकीने त्याची पत्नी अंकिता ही हॉट नसून क्यूट असल्याचे स्पष्ट केले. यामुळे अंकिताला पुन्हा राग आला आणि तिने धक्कादायक बाब सांगत विकीला घटस्फोट देण्याचे संकेत दिले. यापुढे ती असं म्हणाली की, “मला माहित आहे आता तुझे काम झाले आहे आणि शोमधून बाहेर आल्यानंतर मी हा निर्णय घेईन’. यावर मन्नराने ती कोणत्या निर्णयाबद्दल बोलत आहे, असे विचारले असता अंकिताने “तुम्ही ते लवकरच बघाल मित्रांनो” असं उत्तर दिलं.

आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीचं धुमधडाक्यात नव्हे तर कोर्टात होणार लग्न, रिसेप्शन सोहळ्यासाठी अभिनेता करणार अवाढव्य खर्च

दरम्यान, अंकिता-विकी या पती-पत्नीच्या नात्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. त्यांच्या नात्यावर चाहत्यांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यात पुन्हा काही दुरावा निर्माण होणार का? त्यांचे नाते खरच तुटणार तर नाही ना? याविषयी चाहत्यांना हुरहूर लागली आहे.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainAnkita Lokhande and Vicky Jain Bigg Boss 17bigg boss 17entertainmententertainment newsvicky jain
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
bollywood actor aamir khan daughter ira total net worth see the details

आमिर खानच्या लेकीची कमाई किती?, वर्षभरात कमावते इतके कोटी, स्वत:ची प्रॉपर्टी आहे अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.