‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक संघर्षच पहायला मिळाला आहे. या घरातील जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहत असतात. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. अशातच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या विकीने अंकिताची खिल्ली उडवली ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच संतापली. (Ankita Lokhande Vicky
‘बिग बॉस’च्या घरात होणारे अंकिता-विकी यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही आहेत. त्यांच्यात सतत काहीना काही कारणावरून भांडण होत आहे. अशातच आणखी एका वादाची भर पडली आहे. जेव्हा अंकिता घराबाहेर तिच्या वर्कआउट रूटीनबद्दल बोलत होती तेव्हा विकीने तिच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणला आणि ती खोटे बोलत असल्याचे म्हटले. यामुळे अंकिता वैतागली आणि तिने चिडून विकीवर उशी फेकून मारली. तसेच ईशा मालवीयला व्यायाम करताना पाहून “अंकिता असे करण्यासाठी तीन लोकांची मदत घेईल” असंही विकीने गंमतीत म्हटले.
यापुढे मन्नाराने अंकिताचे कौतुक करत ती हॉट दिसत असल्याचे म्हटले. मात्र, यावर विकीने त्याची पत्नी अंकिता ही हॉट नसून क्यूट असल्याचे स्पष्ट केले. यामुळे अंकिताला पुन्हा राग आला आणि तिने धक्कादायक बाब सांगत विकीला घटस्फोट देण्याचे संकेत दिले. यापुढे ती असं म्हणाली की, “मला माहित आहे आता तुझे काम झाले आहे आणि शोमधून बाहेर आल्यानंतर मी हा निर्णय घेईन’. यावर मन्नराने ती कोणत्या निर्णयाबद्दल बोलत आहे, असे विचारले असता अंकिताने “तुम्ही ते लवकरच बघाल मित्रांनो” असं उत्तर दिलं.
आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीचं धुमधडाक्यात नव्हे तर कोर्टात होणार लग्न, रिसेप्शन सोहळ्यासाठी अभिनेता करणार अवाढव्य खर्च
दरम्यान, अंकिता-विकी या पती-पत्नीच्या नात्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. त्यांच्या नात्यावर चाहत्यांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यात पुन्हा काही दुरावा निर्माण होणार का? त्यांचे नाते खरच तुटणार तर नाही ना? याविषयी चाहत्यांना हुरहूर लागली आहे.