‘बिग बॉस १७’ चे यंदाचे पर्व घरातील भांडण, वादविवाद, गॉसिप्स यांमुळे चांगलंच गाजत आहे. शो मधील प्रत्येक स्पर्धक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मेहनत करत आहेत. या शोमध्ये अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यात रोजच वाद होत असतात. पण यांमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होते. अशातच आता अंकिता-विकी यांच्याबद्दल आणखी एक ट्विस्ट आला आहे. काही दिवसांपूर्वी विकिने अंकिताला ती गुंतवणूक असल्याचे म्हटले होते. यावर आता अंकितानेही आता भाष्य केले आहे. अंकिता विकीवर चांगलीच संतापली आहे. (Ankita Lokhande And Vikcy Jain)
गेल्या ‘वीकेण्ड का वार’ करण जोहरने अंकिताला विकी तिला गुंतवणूक म्हटल्याचे सांगितले होते. यावेळी अंकिता करणसमोर विकीला काही बोलली नाही. मात्र काही वेळाने अंकिताने विकीचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी अंकिता विकीला असं म्हणाली की, “मला माहित होते की हा मुद्दा उपस्थित केला जाईल. पण तू मला गुंतवणूक म्हटले आहेस? तुझ्या अशा बोलण्यामुळे लोक मला तुझी गुंतवणूक म्हणून पाहत आहेत.” मात्र विकीनेदेखील “माझा नशिबावर विश्वास आहे” असं म्हणत तिच्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
विकी अंकिताला म्हणाला, “मला माझ्या मेहनतीला श्रेय द्यायचे आहे. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही करतो, जे काही कमावतो ते माझ्या मेहनतीचे असते. नशिबाचे नाही.” यावर अंकिता विकीला उत्तर देत असं म्हणाली , “तू ईशाला मी तुझी गुंतवणूक असल्याचे सांगितले. मी तुला अनेकवेळा विचारत होते की, मला भेटणे ही तुझी गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक कशी होऊ शकते? मला भेटणे हे तुझे नशीब आहे. हे आपले हृदयाचे नाते आहे.” यावर विकीनेही अंकिताला “मी नशिबावर अजिबात विश्वास ठेवत नाही” असे उत्तर दिले.
यावर अंकिताने विकीच्या या विचारांना ‘मूर्ख’ संबोधत असे म्हटले की “तुमच्यासाठी ही एक गुंतवणूक असेल तर चांगलं आहे. मी याचे उत्तर देऊ शकत नाही, मला ते योग्य वाटत नाही. तू अंकिता लोखंडेला आयुष्यात नक्की भेटशील अशी खात्री होती, त्यासाठी तू गुंतवणूक करत होतास. पण ही किती मूर्खपणाची कल्पना आहे. तू एक लॉजीकल माणूस आहेस पण ते तर्क मूर्खपणाचे आहेत.” यावर विकीने अंकिताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत “मी असेच बोलतो, मी सर्वांना समजून घेऊ शकत नाही’ असे म्हणत तिच्याबरोबरचे बोलणे टाळले.
आणखी वाचा – दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर CID फेम कलाकारांना मोठा धक्का, शिवाजी साटमही भावुक, म्हणाले, “साधा, नम्र आणि…”
दरम्यान, अंकिता-विकी या पती-पत्नीच्या नात्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. त्यांच्या नात्यावर चाहत्यांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यात पुन्हा काही दुरावा निर्माण होणार का? त्यांचे नाते तुटणार तर नाही ना? याविषयी चाहत्यांना हुरहूर लागली आहे.