सध्या टीव्हीवर गाजत असलेला लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोची पहिल्या दिवसापासूनच चर्चा सुरू आहे. घरातील वादांमुळे हा शो कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच ईशा मालवीया व समर्थ जुरेल यांच्या एका कृतीमुळे ते दोघे चांगलेच चर्चेत आले आहेत. ईशा मालवीयाची लव्ह लाईफ सध्या बिग बॉसच्या घरात बरीच गाजताना दिसत आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमार व सध्याचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल या शोमध्ये एकत्र आल्यापासून त्यांच्याविषयी अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. याआधीसुद्धा हे दोघे अनेकदा एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच दोघांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला असूनब या व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Bigg Boss 17 : Isha Malviy And Samarth Jurel Video Viral)
‘बिग बॉस’च्या घरात एका टास्कच्या निमित्ताने बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना घरातून बाहेर काढले होते. मग बिग बॉसने एका धक्कादायक ट्विस्टसह घोषणा केली की सर्व सदस्यांनी त्यांच्या सामानासह घरे रिकामी करावीत. आणि यावेळी घरातील लाइट्स चालू-बंद होत होते. आणि अशातच ईशा-समर्थ हे दोघे या संधीचा फायदा घेताना दिसले. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात घरातील सर्वजण अंधारात इकडे तिकडे धावत आहेत आणि हे दोघे एकमेकांना किस करत आहेत. त्यांचा हा किस करतानाचा फोटो बिगबॉसच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bigg Boss apne mohalle (dil, dimaag, dumm) ko shutdown kar rahe hain. Light on/off kar rahe hain. Aur uss waqt chintu ????
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) December 4, 2023
Aapda ko avsar mein badlana koi chintu se sikhe, seedha Isha ko pakad ke shuru hogaye… pic.twitter.com/fWg3A25RVh
आणखी वाचा – Dinesh Phadnis Passes Away : ‘सीआयडी’ फेम फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचं निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
ईशा-समर्थ यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. “बिग बॉसमध्ये प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाते? हे यांना कळत नाही का?, चिंटू (समर्थ) तर अभिनय व अश्लीलतेचं दुकान आहे, हा एक फॅमिली शो आहे यांना कळत नाही का?, ईशाच्या समर्थकांना पण आता याची लाज वाटत असेल, चिंटू (समर्थ) फक्त हेच करायला आला आहे वाटतं” अशा अनेक नकारात्मक कमेंट्स करत या दोघांना ट्रोल केले आहे.
आणखी वाचा – ‘सिंघम अगेन’च्या सेटवर अजय देवगणला गंभीर दुखापत, अॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला जखम झाली अन्…
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात हे दोघे अनेकवेळा रोमान्स करताना दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोघे बेडवर जवळ आले होते. तेव्हाही हे दोघे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत आणि आता पुन्हा हे त्यांच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. दरम्यान ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमान खान या दोघांच्या कृतीवर काय भाष्य करणार? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.