शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “अचानक एका रात्रीत…”, अंकिता लोखंडेचा सुशांत सिंग राजपूतबाबत धक्कादायक खुलासा, ब्रेकअपवरही बोलली, म्हणाली, “शेवटचं पाहिलं तेव्हा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 31, 2023 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "अचानक एका रात्रीत…", अंकिता लोखंडेचा सुशांत सिंग राजपूतबाबत धक्कादायक खुलाासा, ब्रेकअपवरही बोलली, म्हणाली, "शेवटचं पाहिलं तेव्हा…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे. एक अभिनेत्री म्हणून नाही तर तिच्या नवऱ्याबरोबरच्या वादामुळे ती ‘बिग बॉस’च्या घरात अधिक चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून सततच्या भांडणांमुळे त्यांच्या नात्यात अविश्वास निर्माण झाला आहे. अशातच अंकिता लोखंडेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबरोबर झालेल्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. अभिनेत्रीने खुलासा करत म्हटलं आहे की, सुशांतने त्यांचे सहा वर्षांचे नाते का संपवले आहे.

सह-स्पर्धक व कॉमेडियन मुन्नवर फारुकी याबरोबर बोलताना अंकिताने सांगितले की, “सुशांतचं हे जग सोडून जाणं खूपच धक्कादायक होतं. त्यांच्या जाण्याने आम्ही सगळेच दुःखात होतो. माझे आई-वडीलही कोलमडले होते.” अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत अनेक वर्षांपासून दीर्घकालीन नात्यात होते. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेदरम्यान ते भेटले. या मालिकेतील त्यांची मानव व अर्चनाची भूमिका विशेष गाजली. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातील प्रेमात बदलली.

आणखी वाचा – “आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही”, शेफाली शाहचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “अत्यंत वाईट वागणूक…”

अंकिता म्हणाली, ‘तो गेला तेव्हा मी त्याच्या आयुष्यात कुठेही नव्हते. पण, तरीही मी पुढे आले. कारण लोकांनी मला ट्रोल केलं, त्यांना मला दाखवायचं होतं की, आम्ही एकमेकांसाठी काय होतो. माझं ब्रेकअप झालं, तेव्हा हे लोक कुठे होते? तेव्हा मी एकटी होते. आमच्यात ब्रेकअप व्हावा, असं कोणतंही कारण नव्हते. पण अचानक एका रात्रीत माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. ती माझी आणि त्याची शेवटची भेट होती. त्यादिवशी मी त्याला शेवटचे जवळून पाहिले होते. पुन्हा तो तसं कधीच भेटला नाही. एका रात्रीत कोणतंही कारण नसताना त्याने ब्रेकअप केलं. माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की, तो जे काही करतो, ते त्याने मला सांगावं. मला त्याची काळजी होती. पण, त्याच्या डोळ्यात तसं काहीच दिसत नव्हतं. जेव्हा यश मिळतं, तेव्हा कान भरणारे लोक देखील वाढतात.’ असंही अंकिता म्हणाली.

This conversation between #AnkitaLokhande & #MunawarFaruqui about #SushantSinghRajput & #Sushita is so Emotional!!

Specially for the OGs like Me who has seen the whole journey this is so ????????!!#BiggBoss17 #BB17pic.twitter.com/CeilZpaQcw

— Nisha Rose???? (@JustAFierceSoul) October 30, 2023

आणखी वाचा – कोल्हापुरमध्ये बंगला घेतला, फार्महाऊस तयार केलं अन्…; भरत जाधव यांनी कायमची सोडली मुंबई, म्हणाले, “वडिलांची…”

सध्या अंकिता लोखंडे पती विकी जैनसह ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धक म्हणून आली आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून त्यांच्यात वाद पाहायला मिळाले. विकी सतत अंकिताचा अपमान करताना आणि अनादर करणारी भाषा वापरताना दिसला.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmentsushant singh rajput
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Aishwarya Narkar On Bts

Video : …अन ऐश्वर्या नारकर खड्ड्यात पडल्या, असा शूट झाला 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'चा 'तो' सीन, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.