शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही”, शेफाली शाहचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “अत्यंत वाईट वागणूक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 31, 2023 | 9:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shefali Shah On Akshay Kumar

"आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही", शेफाली शाहचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "अत्यंत वाईट वागणूक…"

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने तिच्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःच नाव कमावलं आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचा असा खूप मोठा चाहता वर्ग ही निर्माण केला आहे. सध्या शेफाली तिच्या आगामी ‘थ्री ऑफ अस’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती बऱ्याच ठिकाणी मुलाखती देताना दिसतेय. दरम्यान, शेफाली २००५ मध्ये आलेल्या ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल बोलताना दिसली. २००५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात शेफालीने अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. शेफाली वयाने अक्षय कुमारपेक्षा खूपच लहान आहे, मात्र तरी तिला या चित्रपटात आईची भूमिका देण्यात आली होती, यावर आता शेफालीने प्रतिक्रिया दिली आहे. (Shefali Shah On Akshay Kumar)

अलीकडेच ‘इंडियन एक्सप्रेस’च्या एक्सप्रेस अड्डामध्ये शेफाली शाहने ‘वक्त’ चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेचा उल्लेख केला. यावर शेफाली शाह म्हणाली की, “हे पात्र साकारण्याचे कारण आहे. मात्र, ‘मी माझ्या आयुष्यात अक्षय कुमारच्या आईची भूमिका कधीच साकारणार नाही”, असेही तिने यावेळी स्पष्टपणे सांगितले. यावेळी शेफालीने अत्यंत वाईट वागणूक देणाऱ्या एका दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर काम केल्याचा खुलासा केला. तसेच आपण कधीही पडद्यावर अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही, असंही तिने नमूद केलं.

आणखी वाचा – “आता नाही तर कधीच नाही…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेने दिलाय मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा, म्हणाली, “…आणि मग आत्महत्या”

शेफालीला सेटवरील हायराकीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली, “मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं, त्याचा मला आनंद आहे. असं उत्तर ऐकायला चांगलं वाटतं म्हणून मी बोलत नाहीये, तर हे खरं आहे. मी कदाचित एका दिग्दर्शक आणि एका अभिनेत्याबरोबर काम केले असेल, जे अत्यंत वाईट वागणूक देणारे होते. त्याशिवाय, मी सर्व अशा दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे, ज्यांना वाटतं की कलाकार फक्त कलाकार नसून सहकारी असतात.” त्यानंतर शेफाली हसून म्हणाली, “मी वचन देते की मी आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही.”

आणखी वाचा – ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून गायक बादशाहची चौकशी, पण यामागचं नेमकं कारण काय?

शेफाली शाहने ‘वक्त’चित्रपटात अक्षयच्या आईची भूमिका साकारली होती, तर ‘डार्लिंग’मध्ये तिने एका बाईची भूमिका साकारली होती. शेफाली शाहला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

Tags: akshay kumaramitabh bacchanbollywood actressbollywood movieentertainmentshefali shah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Vishal Nikam Viral Video with Fans

Video : “गरीबीची जाण...”, कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात गेलेल्या मराठी अभिनेत्याने काय केलं पाहा, नेटकरी म्हणाले, “इथे पैशांपेक्षा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.