Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे. एक अभिनेत्री म्हणून नाही तर तिच्या नवऱ्याबरोबरच्या वादामुळे ती ‘बिग बॉस’च्या घरात अधिक चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून सततच्या भांडणांमुळे त्यांच्या नात्यात अविश्वास निर्माण झाला आहे. अशातच अंकिता लोखंडेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबरोबर झालेल्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. अभिनेत्रीने खुलासा करत म्हटलं आहे की, सुशांतने त्यांचे सहा वर्षांचे नाते का संपवले आहे.
सह-स्पर्धक व कॉमेडियन मुन्नवर फारुकी याबरोबर बोलताना अंकिताने सांगितले की, “सुशांतचं हे जग सोडून जाणं खूपच धक्कादायक होतं. त्यांच्या जाण्याने आम्ही सगळेच दुःखात होतो. माझे आई-वडीलही कोलमडले होते.” अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत अनेक वर्षांपासून दीर्घकालीन नात्यात होते. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेदरम्यान ते भेटले. या मालिकेतील त्यांची मानव व अर्चनाची भूमिका विशेष गाजली. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातील प्रेमात बदलली.
अंकिता म्हणाली, ‘तो गेला तेव्हा मी त्याच्या आयुष्यात कुठेही नव्हते. पण, तरीही मी पुढे आले. कारण लोकांनी मला ट्रोल केलं, त्यांना मला दाखवायचं होतं की, आम्ही एकमेकांसाठी काय होतो. माझं ब्रेकअप झालं, तेव्हा हे लोक कुठे होते? तेव्हा मी एकटी होते. आमच्यात ब्रेकअप व्हावा, असं कोणतंही कारण नव्हते. पण अचानक एका रात्रीत माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. ती माझी आणि त्याची शेवटची भेट होती. त्यादिवशी मी त्याला शेवटचे जवळून पाहिले होते. पुन्हा तो तसं कधीच भेटला नाही. एका रात्रीत कोणतंही कारण नसताना त्याने ब्रेकअप केलं. माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की, तो जे काही करतो, ते त्याने मला सांगावं. मला त्याची काळजी होती. पण, त्याच्या डोळ्यात तसं काहीच दिसत नव्हतं. जेव्हा यश मिळतं, तेव्हा कान भरणारे लोक देखील वाढतात.’ असंही अंकिता म्हणाली.
This conversation between #AnkitaLokhande & #MunawarFaruqui about #SushantSinghRajput & #Sushita is so Emotional!!
— Nisha Rose???? (@JustAFierceSoul) October 30, 2023
Specially for the OGs like Me who has seen the whole journey this is so ????????!!#BiggBoss17 #BB17pic.twitter.com/CeilZpaQcw
सध्या अंकिता लोखंडे पती विकी जैनसह ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धक म्हणून आली आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून त्यांच्यात वाद पाहायला मिळाले. विकी सतत अंकिताचा अपमान करताना आणि अनादर करणारी भाषा वापरताना दिसला.