Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Engagement : छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांचा लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. यानंतर आता मुग्धा-प्रथमेशच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटो समोर आले आहेत. मुग्धा-प्रथमेशच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटो पाहता चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
लग्नानंतर आता मुग्धा व प्रथमेशच्या साखरपुडा समारंभातील फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये मुग्धा प्रथमेशच्या हातातील कपल रिंगने लक्ष वेधून घेतलं. प्रथमेशने मुग्धाला अंगठी घालत त्यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. दोघांनी अगदी रोमँटिक पोज देत शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. मुग्धाने तिच्या साखरपुडा सोहळ्यासाठी हिरव्या रंगाची साडी नेसली होती तर प्रथमेशनेही हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
मुग्धा-प्रथमेशच धुमधडाक्यात लग्न आटोपलं. कुटुंबीय, नातेवाईक, आणि कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींच्या उपस्थितीत अगदी शाही थाटामाटात त्यांनी लग्न केले. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नातील फोटोंसह आता त्यांच्या साखरपुड्यातील फोटोही समोर आले आहेत. तसेच लग्नापुर्वीच्या विधींमधील ग्रहमख तसेच हळदी समारंभातील साधेपणानेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेश यांनी ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत सोशल मीडियावरुन त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर हे जोडपे कधी लग्नबंधनात अडकणार, याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहे. अशात मुग्धा-प्रथमेशचा लग्नसोहळा संपन्न झाला. दोघांनी त्यांच्या साखरपुड्याची ही गोड बातमी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.