‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक संघर्षच पहायला मिळाला आहे. या घरातील जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहत असतात. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. गेले काही दिवस अंकिताला पती विकी जैनबाबत असुरक्षितता वाटत असल्याचे दिसून येत आहे. विकीची मन्नाराबरोबरची मैत्री अंकिताला सहन होत नाही आहे. अशातच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात विकी व अंकिता यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विकी अंकिताला मी तुझा गुलाम नाही असंही म्हटला आहे. (Ankita Lokhande Vicky Jain)
‘बिग बॉस’च्या नुकत्याच आलेल्या एका प्रोमोमध्ये विकी व मन्नारा यांच्या मैत्रीवरुन अंकिता नवऱ्याबरोबर हुज्जत घालताना दिसली. या व्हिडीओमध्ये अंकिता विकीला असे म्हणते की, “तुझ्या आयुष्यात अचानक मन्नारा आली आहे आणि तिच्याबरोबर गप्पा-गोष्टी करताना तुला खूप मज्जा येते. तु आजकाल फक्त तिच्याच अवतीभवती बसलेला असतो.” यावर विकी तिला असे म्हणतो की, “मग यात चूक काय आहे?, तिच्याबरोबर बसण्याबरोबरचं काय लॉजिक आहे हे मला सांग”. यावर अंकिता पुन्हा त्याला “मी मन्नारावरुन तुला बोलते आहे तर तुला राग येत आहे का?” असं चिडून म्हणते.
Promo BiggBoss17 Ankita Lokhande ka rona dhona phir se shuru, Manara ko lekar Vicky se phir ladhi pic.twitter.com/5LgoGQyJ3P
— The Khabri (@TheKhabriTweets) January 7, 2024
यावरुन त्यांच्यात पुन्हा स्वयंपाकघरातदेखील वाद होतात. यावेळी अंकिता विकीला “तू स्वत:ला खूप सुशिक्षित समजतोस ना?, कदाचित मी पण आयुष्यात विचार करुन निर्णय घेतला असते तर बरं झालं असतं.” असं म्हणते. यावर विकी “तु आयुष्यात कोणता निर्णय विचार करुन घेतला आहेस?” असं म्हणत तिला टोमणा मरतो. यावर अंकिता रडून तिच्या रूममध्ये जाते आणि यावेळी अंकिता विकीला “तुझे माझ्यावरचे प्रेम आता कमी झाले आहे” असं म्हणते. यावर विकीदेखील अंकिताला असे उत्तर देतो की, “तुझ्याशी लग्न केले आहे याचा अर्थ मी तुझा गुलाम नाही आहे.”
दरम्यान, हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एकाने असं म्हटले आहे की, “अंकिताच्या या स्वभावामुळे तिचे सुशांतबरोबर ब्रेकअप झाले असावे, ती मन्नारामुळे चिडचिड करत नसून ती विकीच्या वागण्यावर नाराज आहे आणि या प्रोमोमध्ये ती ज्याप्रमाणे रडली आहे तशी ती याआधी अनेकदा रडली आहे” अक्षय अनेक कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान यावरून आता त्यांच्यात आता आणखी नवीन वाद तयार होणार का? पुन्हा त्यांच्या नात्यात काही संघर्ष निर्माण होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.