Isha Koppikar-Timmy Narang Divorce : इशा कोप्पीकर व टिमी नारंग यांचं १४ वर्षांच्या जुन्या नात्याने नवं वळण घेतलं आहे. १४ वर्षांचा संसार मोडून या जोडप्याने अखेरचा घटस्फोट घेतला आहे. याबाबत आता खुद्द टिमी नारंगने या वृत्ताला दुजोरा देत याबाबत भाष्य केलं आहे. घटस्फोटानंतर आता अभिनेत्री इशाने टिमी नारंगचे घर सोडले आहे. त्यांची नऊ वर्षाची मुलगी रियानासह वेगळे राहण्यास ती तयार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टिमी म्हणाला, “जवळपास दीड वर्ष आम्ही घटस्फोटाचा विचार केल्यानंतर त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी तयार झालो”.
टिमी पुढे म्हणाला, “घटस्फोट गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मंजूर झाला होता आणि तो परस्पर अटींवर होता. आम्ही दोघेही आता आपआपल्या आयुष्यात पुढे जाण्यास मोकळे आहोत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याबाबत कोणताही संभ्रम नसावा, असे मला वाटत नाही. मी अलीकडील अहवाल वाचले नसले तरी, कायदेशीर पर्यायांचा विचार करणे देखील पर्याय नाही कारण घटस्फोट आधीच झाला आहे”, असंही तो म्हणाला.
टीमी नारंग व इशा नारंग यांनी २००९ मध्ये लग्न केले होते. इशा कोप्पीकर व टिमी नारंग यांची पहिली भेट एका जिममध्ये झाली. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले. एकमेकांना डेट करण्यापूर्वी इशा व टिमी तीन वर्षे मित्र होते. २००९ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर इशा सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
इशा कोप्पीकरने अनेक हिंदी तसेच तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख खानचा चित्रपट ‘डॉन’, विवेक ओबेरॉय स्टारर ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘कयामत’ या हिंदी चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. आता लवकरच ती तमिळ सायन्स-फिक्शन चित्रपट आयलनमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात शिवकार्तिकेयन, रकुल प्रीत सिंग आणि शरद केळकर हे कलाकारही असणार आहेत.