रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला रणबीर कपूरची आलिया भट्टसह हजेरी, रश्मिका मंदानाला केलं किस अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 7, 2024 | 6:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Animal Movie Success Party

Video : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला रणबीर कपूरची आलिया भट्टसह हजेरी, रश्मिका मंदानाला केलं किस अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत अनेक हिट चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला. १ डिसेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा ही सुरुच आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची वाढवलेली उत्सुकता चित्रपटाने पूर्ण केली. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर या कलाकाराच्या महत्त्वपूर्ण भूमिका विशेष ठरल्या. याशिवाय चित्रातील गाण्यांनी या चित्रपटाची उंची वाढविली असं म्हणायला हरकत नाही. (Animal Movie Success Party)

प्रेक्षकांनी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शो हजेरी लावली. या सक्सेसफुल चित्रपटाची नुकतीच आलिशान अशी सक्सेस पार्टी झाली. ६ जानेवारीला मुंबई येथे चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला चित्रपटातील कलाकारांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या सक्सेस पार्टीमधील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – ‘चारचौघी’ फेम पार्थ केतकर अडकला विवाहबंधनात, नाटकाच्या संपूर्ण टीमची लग्नाला उपस्थिती, फोटो व्हायरल

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. चित्रपटातील कलाकारांसह आलिया भट्ट, महेश भट्ट, नीतू कपूर, तमन्ना भाटिया, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय यासह अनेक बॉलीवूडचे कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने देखील तिच्या बोल्ड अँड ब्युटीफुल अशा काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये हजेरी लावली होती. रश्मिका मंदानाच्या एंट्रीवेळी रणबीर कपूरने रश्मिकाला किस केलेल्या एका व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – ‘दादा एक गुडन्यूज आहे’ फेम ऋषी मनोहरचा शाही विवाहसोहळा संपन्न, अभिनेत्याची आईदेखील आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रश्मिकाचं पार्टीत स्वागत करताना रणबीरने तिला मिठी मारत गालावर किस केलं आहे. हा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रणबीरने या सक्सेस पार्टीला आलिया भट्ट, नीतू कपूर यांच्यासह हजेरी लावलेली पाहायला मिळाली. यावेळी ही रणबीर व आलिया यांच्या हटके लूकने साऱ्यांच्या नजरा वळवल्या. रोमँटिक पोज देतानाच त्यांचे व्हिडीओ, फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Tags: animal movieanimal movie success partyentertainmentranbir kapoorrashmika manadana
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Ira Khan-Nupur Shikhare Wedding

Video : लेकीच्या लग्नात उदयपूरच्या पॅलेसमध्ये बेभान होऊन नाचला आमिर खान, पूर्वपत्नीही होती बरोबर, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.