शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुनिया तुमच्यावर हसत आहे आणि…”, अंकिता लोखंडेच्या आईने दोघांनाही सुनावलं, पण सासूसमोरच बायकोला ओरडला, म्हणाला, “तुला आयुष्यात…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 9, 2024 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 ankita lokhande and vicky jain mother entry in the house give some suggestion to the wife husband

"दुनिया तुमच्यावर हसत आहे आणि...", अंकिता लोखंडेच्या आईने दोघांनाही सुनावलं, पण सासूसमोरच बायकोला ओरडला, म्हणाला, "तुला आयुष्यात..."

‘बिग बॉस १७ हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून या शोचा आता अंतिम प्रवास सुरु झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आता फक्त ९ स्पर्धक राहीले आहेत. अशातच ‘बिग बॉस’ने सर्व स्पर्धकांना एक खास भेट दिली आहे. हा शोच्या अंतिम भाग होण्यापूर्वी, ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबीयांशी ओळख करुन देणार आहे. त्यामुळे येत्या ‘फॅमिली स्पेशल’ वीकमध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. कलर्सच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडल्सद्वारे एक नवीन व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावेळी अंकिता व विकी हे दोघे त्यांच्या आईंना पाहून आनंदी त्याचबरोबर भावुकही झाले असल्याचे पाहायला मिळाले. (Bigg Boss 17 New Promo)

यावेळी अंकिताची आई आपल्या लेकीला व विकीला समजावताना दिसते. यावेळी ती दोघांना सूचना देत असे म्हणते की, “तुम्ही जसे आहात, तसे या शोमध्ये दिसत नाही आहात. तुमच्यातील वाद आता वाढत आहेत. मला गेले काही दिवस तुमच्या वादामुळे झोप येत नाही आहे. जग तुमच्या नात्याची चेष्टा करत आहे. त्यामुळे तुम्ही जरा समजून उमजून वागा, बोलताना भान ठेवा. घराबाहेर तुमचे अनेक चाहते आहेत, त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट बोलल्यानंतर त्यांना तुम्ही हे असं काय बोलून गेलात असं वाटलं नाही पाहिजे.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा –  “मुंबई सगळ्यात वाईट शहर कारण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली, “बँडस्टँड, हाजीअलीसारखी ठिकाणं…”

यापुढे अंकिताची आई दोघांना त्यांच्या खेळावरुन काही सूचना देते. यावेळी ती असे म्हणते की, “विकी त्याचा त्याचा खेळ खेळत आहे, त्याला खेळुदेत, मग अंकिता तु तुझा खेळ खेळण्याचा प्रयत्न कर. तुम्ही दोघांनी समंजसपणे खेळा. तुम्ही दोघे एकमेकांचे स्पर्धक आहात, शत्रू नाही. या घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला पुढे एकत्र आयुष्य जगायचे आहे.” त्याचबरोबर अंकिताची आई असे म्हणते की, “घराबाहेर खुप साऱ्या गोष्टी घडत आहेत.” यावर अंकिता चिडून असे म्हणते की, “काय होत आहे घराबाहेर? आम्ही नॉर्मल तर वागत आहोत.”

आणखी वाचा –  Bigg Boss 17 : नवऱ्याला लाथ मारल्यानंतर सासूने अंकिता लोखंडेला सुनावलं, अभिनेत्रीच्या आईला फोन करत संस्कारही काढले, म्हणाल्या “तुम्ही तुमच्या नवऱ्याला…”

यावर पुन्हा विकी अंकिताची समजूत काढत असे म्हणतो की, “तुझी आई काय म्हणत आहे तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला आयुष्यात कधी सुधारायचे नाही आहे का? त्या जे काय बोलत आहेत, त्यावर आपण दोघांनी विचार करुन निर्णय घेऊ”. दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स् व कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओखाली अंकिताच्या आईचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर काहींनी अंकिता दुटप्पीपाने वागत असल्याचेही म्हटले आहे.    

Tags: ankita lokhandebigg boss 17bollywood actressBollywood entertainmentbollywood newsentertainment newsmarathi actorvicky jainअंकिता लोखंडेबिग बॉसबिग बॉस १७मनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Supriya Pathare Video

Video : सुप्रिया पाठारेंच्या घरी महाआरती आणि पूजेचा थाट, इतका मोठा आहे हॉल, व्हिडीओमध्ये दिसली घराची झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.