शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिने सुशांतला मिठी मारली अन्…”, विकी जैनशी लग्न होऊनही सुशांत सिंह राजपूतला विसरु शकली नाही अंकिता लोखंडे, म्हणाली, “खूप राग यायचा कारण…”

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 4, 2023 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankita admits she was possessive about sushant singh

Ankita admits she was possessive about sushant singh

‘बिग बॉस १७’ हा रिअ‍ॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. भांडणं, वादावादी यामुळे हा कार्यक्रम पहिल्यापासूनच चर्चेत आहे. अंकिता व विकी हे जोडपं तर ‘बिग बॉस’मध्ये आल्यापासून चांगलंच चर्चेत आहे. अंकिता बऱ्याचदा तिच्या एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत गुंतलेली पहायला मिळते. यापूर्वीही तिने या शोमध्ये आल्यापासून सुशांतची बऱ्याचदा आठवणीत रमताना व भावनिक होतानाही दिसते. आताही तिने सुशांतबरोबरच्या ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमाच्या आठवणी सांगितल्या.(Ankita admits she was possessive about sushant singh)

अंकिता व सुशांत ‘झलक दिखला जा’ या डान्स कार्यक्रमाच्या ४थ्या पर्वात दिसले होते. यावेळच्या आठवणी सांगताना अंकिताने सांगितलं होतं की सुशांतच्या जवळ दुसरी कोणती व्यक्ती आल्यास तिला बरंच असुरक्षित वाटायचं. याबाबत नुकतंच ती ‘बिग बॉस’च्या घरात बोलताना दिसली. ‘बिग बॉस’च्या लाइव व्हिडीओमध्ये अंकिताला या गोष्टींबाबत बोलताना पाहिलं गेलं. यावेळी तिच्याबरोबर ईशा मालवीय व अभिषेक कुमार होते. अंकिता सांगते की, “’झलक दिखला जा’मध्ये टॉप ५ मध्ये असताना सुद्धा मी इतकी फोकस नव्हते. मी या शोदरम्यान मध्येच बाहेर चालायला निघून जायची. मी बऱ्याचदा निशांत (कदाचित निशांत भट्ट)ला  सांगायचे की ही स्पर्धा आपण सोडू”.

For those who are saying how dare #AnkitaLokhande talk about SSR? Listen, Ankita has the right to talk about SSR as they were in a relationship. You won't decide what Ankita says; many of you didn't even watch his movies when he was alive.pic.twitter.com/VzO8U5P1Eg

— Lady Khabri (@KhabriBossLady) December 3, 2023

आणखी वाचा – रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही टाकलं मागे, एका दिवसातच कमावले तब्बल…

अभिषेकने पुढे अंकिताला सुशांतबाबत विचारलं की तो कुठपर्यंत पोहोचला होता? त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “तो पहिल्या दोनमध्ये होता. मी त्याला म्हणाले होते की तू हर आता. जर जिंकलास ना तर बरीच गडबड होईल. त्याला सगळ्यात पहिल्यांदा तीस गुण मिळाले होते. त्याचे हे गुण पाहता मी चकीत झाले. मला कळेना याला कसे तीस गुण मिळाले”. त्यावेळी तिला ईशाने विचारलं, “कोण होती तिची डान्स पार्टनर?” यावर अंकिता म्हणाली, “चांगली होती”.याबाबत पुढे सांगताना ती म्हणाली, “ती खूप चांगली डान्सर होती. सुशांत डान्स करताना तिने सुशांतला मिठी मारली. हे पाहता मला खूप वाईट वाटलं. सुशांतच्या जवळ कोणती मुलगी आली तरी मला असुरक्षित वाटायचं. आता माझ्यात खूप बदल झाला आहे. मला पूर्वी खूप राग यायचा. मी पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करायचे. आता मी खूप शांत झाले आहे”.

आणखी वाचा – “दारुच्या नशेत तिने मला…”, पार्टीमध्ये ‘दंगल’ फेम फातिमा शेखबरोबर बरोबर घडला धक्कादायक प्रकार, म्हणाली, “उद्धट होती आणि…”

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनीही अंकिताच्या या वक्तव्यावार तिला चांगलंच ट्रोल करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर या वक्तव्यावरून, “ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोलत आहेत”. एकाने नेटकऱ्यांने सांगितलं, “अंकिताने हे सगळं सुंदर भूतकाळ म्हणून स्विकारलं पाहिजे. वर्तमानकाळ म्हणून तिने याचा विचार करू नये. कारण असं वागून ती विकी जैनबरोबर खूप चुकीचं वागत आहे. जर ती आतापर्यंत यासगळ्यातून सावरली नाही आहे तर तिने विकीबरोबर लग्न का केलं?”, असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारला जात आहे.

Tags: ankita lokhandebigg boss 17jhalak dikhhla jaasushant singh rajputVikki jain
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
cid fame actor dyanand shetty refues rumours of dinesh phadnis aka frederic suffering from heart attack

"अजूनही व्हेंटिलेटरवर असून…", CID फेम फ्रेडरिक्सच्या प्रकृतीबाबत दयानंद शेट्टींंचा मोठा खुलासा, म्हणाले, "हृदयविकाराचा झटका आला नाही तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.