‘दंगल’ चित्रपटातून अभिनेत्री फातिमा सना शेखला बरीच प्रसिद्ध मिळाली. या चित्रपटात तिने आमिर खानच्या लेकीची भूमिका केली होती. बालकलाकार म्हणून तिने आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. फातिमाने आपल्या अभिनयातून चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिने आपल्या अभिनयातून सगळ्यांचं मनं जिंकलं आहे. फातिमा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तरिही तिच्याबरोबर अलिकडे गैरवर्तनाला समोर जावं लागलं होतं.याचा खुलासा तिने नुकत्याच एका मुलाखतीत केला. (Fatima cried due misbehavior in party by girl)
काही दिवसांपूर्वी फातिमा तिच्या मित्राच्या एका पार्टीला गेली होती. त्या पार्टीत तिच्या एक मित्राशिवाय ती इतर कोणालाही ओळखत नव्हती. याबाबत तिने ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला. या प्रकाराबद्दल सांगताना ती म्हणाली, “मी अलीकडे एका पार्टीला गेले होते आणि मला तिथे एक अतिशय असभ्य मुलगी भेटली जिला मी ओळखत नव्हते. कधी कधी असं होतं की काही लोकं त्याच्या असभ्य वर्तनासाठी दारुचा वापर करतात.”.
ती पुढे सांगते, “ती मुलगी मला सांगायला लागली की मला तुला आय लायनर लावायचं आहे. ती खूप दारुच्या नशेत होती त्यामुळे मीही तिचं ऐकून घेत होते. ती थोडी उद्धट होती. तिने असं का केलं मला माहित नाही. मग ती मला म्हणाली की तुझा चेहरा खूप छान आहे. मला तुझे केस बांधु दे. मी तिला नाही म्हणाले तसंही मी तुला माझ्या डोळ्यांना आय लायनर लावू दिलं. मला माझे केस नाही बांधायचे. त्यावर ती म्हणाली किती गरम होत आहे. तुला केस का नाही बांधायचे? त्यावर मी तिला सांगितलं हे केस माझे आहेत, मला नाही बांधायचे. त्यानंतर ती मला म्हणाली की तू इतकी उद्धट का बोलतं आहेस? त्यावर मी तिला म्हणाले तुला काही अडचण आहे का? की तू मला पुन्हा पुन्हा स्पर्श करत आहेस आणि मला तुला हवं तस बदलत आहेस”.
या सगळ्या वादावादीत फातिमाला इतकं वाईट वाटलं की तिच्या डोळ्यातून पाणी आलं. काही वेळानंतर त्या मुलीने सांगितलं की, ती मानवी हक्कांसाठी काम करते. फातिमाच्या मते जे लोक विनाकारण इतरांशी गैरवर्तन करतात त्यांना खरंच लाज वाटली पाहिजे. फातिमा १ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती माजी राष्ट्रपती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी कौशल, सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. या अगोदर ती ‘धक-धक’ या चित्रपटात दिसली होती.