‘बिग बॉस १७’ या लोककप्रिय शोचा प्रवास आता अंतिम भागाकडे चालला असून या शोने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. ‘बिग बॉस’च्या घरात राहिलेले सर्व स्पर्धक अंतिम भागात आपले स्थान टिकवण्यासाठी प्रत्येक टास्कमध्ये सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या पर्वात अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी चांगलीच गाजली. एकमेकांमधील भांडणं, वादविवाद, रूसवे-फुगवे, मतभेद यांसह दोघांमध्ये त्यांच्या नात्यावरही अनेकदा प्रश्नचिन्हे उपस्थित झाली.
‘बिग बॉस’मधील अंकिता व विकी यांना घराबाहेरुन अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. घराबाहेरील अनेक चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारही या दोघांना पाठिंबा देत आहेत. यापूर्वीही बॉलिवूड विश्वातून रश्मी देसाई, राखी सावंत, कंगना रानौतसह अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला असल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच अभिनेत्री शेफाली जरीवाला या अभिनेत्रीनेही या दोघांना पाठिंबा दिला आहे. ‘न्यूज18’ दिलेल्या खास मुलाखतीत, अभिनेत्री शेफाली जरीवालाने ‘बिग बॉस’मधील अंकिता व विकी यांच्या खेळाविषयी भाष्य केले आहे.
आणखी वाचा – घाणेरड्या शब्दात कमेंट करत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुम्ही लवकर…”
यावेळी शेफालीने असे म्हटले की, “बिग बॉस हा माझा आवडता शो आहे. मला हा शो पाहण्याची व तो फॉलो करण्याची इच्छा आधीपासूनच आहे. पण माझ्या ‘शैतानी रस्में’ या मालिकेमुळे मला ते करता येत नाही. या मालिकेमुळे मला ‘बिग बॉस’ शो बघायला वेळ मिळत नाही. पण या शोमधील अंकिता व विकी हे माझे आवडते स्पर्धक आहेत. त्याचबरोबर हे दोघे माझे चांगले मित्रही आहेत. या दोघांपैकी कुणीही जिंकलं तरी मला आनंदच आहे. त्यामुळे त्या दोघांनाही माझ्या शुभेच्छा.”
दरम्यान, या शोमध्ये सध्या अंकिता लोखंडे, विकी जैन, मुन्नवर फारुकी, आयेशा खान, ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण महाशेट्टी हे ८ स्पर्धक बाकी आहेत. या ८ स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. येत्या २८ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये खुपच उत्सुकता निर्माण झाली आहे.